रब्बीच्या हंगामासाठी शेतकरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 05:35 PM2019-11-18T17:35:49+5:302019-11-18T17:36:21+5:30
सायखेडा : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली, शेतीचे अतोनात नुकसान झाले. माथी कर्ज वाढले. चार महिने कुटुंबाचे कष्ट वाया गेले. शेती धोक्यात आली. अशी भयानक अवस्था असतानाही शेतकरी पुन्हा एकदा रब्बीच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.
सायखेडा : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली, शेतीचे अतोनात नुकसान झाले. माथी कर्ज वाढले. चार महिने कुटुंबाचे कष्ट वाया गेले. शेती धोक्यात आली. अशी भयानक अवस्था असतानाही शेतकरी पुन्हा एकदा रब्बीच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.
खरीप हंगाम पाण्यात गेला आता रब्बीतरी पिकू दे असे साकडे त्याने निसर्गाला घातले असून एका महिन्यातील सर्व दु:ख बाजूला सारत रब्बीच्या हंगामाला सुरवात केली आहे, सगळीकडेच या नवीन आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहे. रब्बीच्या हंगामातील पिके उभी करण्याच्या कामाला वेग आला आहे.
जून महिन्यात सुरु होणारा खरीप हंगाम सुरवातीपासून दमदार पावसामुळे दमदार राहिला, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुंग यासह नगदी पिके टमाटे, कोबी, फ्लॉवर, वांगे, वेलवर्गीय पिके, पालेभाज्या हि सर्वच पिके सुरवातीपासून जोमात होती.
मागील वर्षी दुष्काळ परिस्थितीमुळे जमीन अनेक महिने पडून असल्याने मेहनत करून जमिनीचा पोत टिकवून असल्याने पिके बहरली होती. हंगाम अंतिम टप्प्यात आला होता, पिके परीपक्वतेकडे झुकली होती, आणि अचानक परतीच्या पावसाने मागील महिन्यात सरासरी चौदा दिवस मुक्काम ठोकला आणि अचानक आलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सोंगलेली धान्य जमिनीत सडली, शेतात उभी असलेले धान्य सडून गेली. भाजीपाला आणि फळभाज्यावर विविध रोगांनी थैमान घातले त्यामळे लाखो रु पये भांडवल म्हणून खर्च केलेले पाण्यात गेले.
खरीप हंगामातील जवळपास नव्वद टक्के नुकसान झाले असा कृषी विभागाकडून अधिकृतपणे सांगत असले तरी प्रत्यक्ष मात्र अनेक ठिकाणी १०० टक्के नुकसान झाले आहे. सर्व सहन करत शेतकरी पुन्हा एकदा रब्बीचे पिके शेतात उभी करण्यासाठी तयार झाला आहे. भरपूर पाणी असल्याने रब्बी हंगामातील पीके जोमदार होतील अशी अपेक्षा आहे. रब्बीचा हंगाम जोरात असल्याचे दिसून येत आहे.
अनेक भागात भौगोलिक रचणे नुसार खरीप हंगाम जोरात होत असला तरी रब्बी मात्र जोरदार होत नाही, यंदा प्रथमच रब्बी हंगाम जोरात सुरू झाला आहे.
गहू, हरभरा, कांदे हि प्रमुख नगदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे रब्बीत देखील भाजीपाला, फळभाज्या घेण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. सोयाबीन, मक्याच्या वावरात भाजीपाला पिकवून चार पैसे मिळतील, खरीपात खर्च झालेले भांडवल वसूल होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्याने सर्व विसरून नवीन पिके घेण्यासाठी त्याने कंम्बर कसलीे आहे.
सरासरी पेक्षा वाढ
दरवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचा हंगाम जोरदार असणार आहे. इथून मागे अनेक भागात कमी पाऊस पडत असल्याने उन्हाळ्यात येणारी पिके घेतली जात नाही. पाऊस जोरदार झाल्याने खरीप हंगामा इतकीच रब्बीतील पिके असणार आहे. निसर्गाचा प्रकोप झाला नाही तर खरीप हंगामातील पिके जोरदार असतील, अशी शक्यता आहे. थंडीचा जोर वाढत असल्याने तो पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
- बी. जी. पाटील, कृषी अधिकारी, निफाड.
अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीपाची वाट लागली. आता रब्बी हंगामातील पिके तरी जोरदार येऊ दे असे निसर्गाला साकडे घालत सर्व दु:ख मनात साठवत पुन्हा एकदा परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहे. नजरे समोर दिसणारी आव्हाने शेतकºयाला शांत बसू देत नाही.
- किरण सुरवाडे, शेतकरी, पिंपळस.