गोणीतून कांदा लिलावास पिंपळगावी शेतकऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 10:18 PM2020-04-02T22:18:47+5:302020-04-02T22:19:21+5:30
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनिश्चित काळासाठी कांदा लिलाव बंद करण्यात आले होते; परंतु शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी गोणीतून कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. त्याला शेतकºयांनीही प्रतिसाद देत गोणीतून कांदा लिलावासाठी आणल्याचे येथील बाजार समितीत दिसून आले.
पिंपळगाव बसवंत : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनिश्चित काळासाठी कांदा लिलाव बंद करण्यात आले होते; परंतु शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी गोणीतून कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. त्याला शेतकºयांनीही प्रतिसाद देत गोणीतून कांदा लिलावासाठी आणल्याचे येथील बाजार समितीत दिसून आले.
सभापती व संचालकांच्या बैठकीत गोणीतून जर कांदा शेतकºयांनी लिलावासाठी आणला तर लिलाव पुन्हा सुरू केला जाईल, त्यावर शेतकºयांनी कांदा शेतात पडून खराब होऊ नये म्हणून कांदा ४५ ते ५० किलोच्या गोणीत भरून लिलावासाठी आणला. त्यात १४० ट्रॅक्टर व १०३ पिकअप वाहनातून एकूण १२४० गोणी कांदा आवक झाली. त्याप्रमाणे एकूण अंदाजे आवक ५५०० क्विंटल इतकी झाली असून, बाजारभाव कमी कमी २००, जास्तीत जास्त १६८१, तर सरासरी १४८१ रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. विक्र ी झालेल्या कांद्याचे पेमेंट तत्काळ संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात आॅनलाइन वर्ग करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर, उपसभापती दीपक बोरस्ते, निवृत्ती धनवटे, शंकर ठक्कर, नारायण पोटे, सचिव ए. बी.पाटील, व्यापारी प्रतिनिधी हितेश ठक्कर, परेशकुमार ठक्कर, जेठमल ठक्कर, ईश्वर भंडारे, विलास नीळकंठ, रूपेन शहा, संतोष ठक्कर, महेश कलंत्री, मनोजकुमार ललवाणी, विलास देवरे, संतोष वाघ ,ज्ञानेश्वर वडनेरे, यशवंत थोरात, बापू थोरात, नंदू नागरे आदी उपस्थित होते.
कांदा लिलाव सुरू करण्यापूर्वी बाजार समिती आवारात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच बाजार आवारात सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. शेतकरी, व्यापारी व मजुरांना मास्कचे वाटप करण्यात आले.