मेथी,शेपू, कोथींबीर बाजार समितीत टाकून शेतकरी परतले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 01:52 PM2020-11-25T13:52:07+5:302020-11-25T13:57:07+5:30
नाशिक- सध्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घसरले असून मेथी, शेपू आणि कोथींबिर अवघे एक ते तीन रूपये प्रति जुडी असा भाव मिळत असल्याने नाशिक बाजार समितीच्या आवारात शेकडो जुड्या तेथेच फेकून अनेक शेतकऱ्यांना परतावे लागले. अल्पदरामुळे उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे.

नाशिकमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईचे वाशी मार्केट तसेच अन्य ठिकाणी पाठवला जातो. त्यामुळे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीपाला घेऊन येतात. सध्या आवक वाढल्याने दर मात्र घरसले असून यामुळे शेतकऱ्यांना माल येथेच टाकून जाण्याची नामुष्की येत आहे. गेल्या रविवारी तर एक रूपया जुडी असा भाव मिळाला होता त्यानंतर आता पुन्हा एक ते तीन रूपये भाव मिळाल्याने सकाळीच बाजार समितीत शेतकरी तसेच माल टाकून निघून गेले. भाजीपाल्याचे दर सातत्याने घरसत असल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत.
नाशिक जिल्हयाच्या अन्य बाजार समित्यामंध्ये कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने शेतकरी आधीच त्रस्त असतानाच आता भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.