डिझेलसाठी शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 09:20 PM2021-05-12T21:20:55+5:302021-05-13T00:24:48+5:30
राजापूर . येवला तालुक्यातील राजापूर येथे कडकडीत बंद सुरु असल्याने व फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही डिझेल-पेट्रोल मिळणार नसल्याने शेतात सुरू असलेली कामे डिझेल अभावी बंद राहू नये यासाठी शेतकऱ्यांची डिझेल भरण्यासाठी धावपळ उडाली होती.

जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवांनाच पंपावर डिझेल, पेट्रोल दिले जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात नांगरणी, जेसीबी मशीनच्या साह्याने जमीन सपाटीकरण व शेततळे आदी कामे सुरु असून या कामांना डिझेल मिळणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांना पुढे पावसाळ्याच्या अगोदर शेतातील कामे करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना डिझेल न मिळाल्यास शेतात सुरू असलेली कामे बंद ठेवणे भाग पडणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्बंधांचा सर्वधिक फटका बसणार आहे.