वाइन उद्योगाच्या मदतीला धावले शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:45+5:302021-04-27T04:15:45+5:30
कोट - कोरोनाच्या संकटामुळे टेबल ग्रेप्सवाले शेतकरी दरामुळे तर वाइन ग्रेप्सवाले शेतकरी वजनामुळे अडचणीत आले. वायनरींनी जे काही करार ...
कोट -
कोरोनाच्या संकटामुळे टेबल ग्रेप्सवाले शेतकरी दरामुळे तर वाइन ग्रेप्सवाले शेतकरी वजनामुळे अडचणीत आले. वायनरींनी जे काही करार केलेले होते, त्या सर्व मालाचे क्रशिंग केल्याने शेतकऱ्यांच्या हाती काहीतरी पडले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी उद्योगांना सहकार्य केले आहे, याची कसर भविष्यात भरुन निघेल अशी अपेक्षा आहे.
- माणिकराव पाटील, पदाधिकारी, राज्य द्राक्ष बागायतदार संघ
चौकट-
नुकसान भरून निघण्याचा विश्वास
मागील वर्षभरापासून वाइन उद्योग संकटात आहे. निर्यात पूर्णपणे बंद आहे. स्थानिक बाजारातही अनेक निर्बंध असल्यामुळे बार, रेस्टॉरंट बंद राहिले. परिणामी, शिल्लक वाइनचे प्रमाण अधिक हाते. या संकटाच्या काळात शेतकरीच या उद्योगाच्या मदतीला धावले. आज झालेले नुकसान उद्या भरून निघेल, असा शेतकऱ्यांना विश्वास आहे.