पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रचले सरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:22 AM2018-12-15T01:22:10+5:302018-12-15T01:22:33+5:30
पालखेड डाव्या कालव्याचे पाणी मिळावे म्हणून येवला तालुक्यातील पूर्व भागातील अंदरसूल, देवळाणे, दुगलगाव आणि बोकटे येथील शेतकºयांनी येवला तहसील कार्यालयाच्या आवारात आक्रमक भूमिका घेत अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
येवला : पालखेड डाव्या कालव्याचे पाणी मिळावे म्हणून येवला तालुक्यातील पूर्व भागातील अंदरसूल, देवळाणे, दुगलगाव आणि बोकटे येथील शेतकºयांनी येवला तहसील कार्यालयाच्या आवारात आक्रमक भूमिका घेत अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पाणी मिळत नसल्याने प्रशासनाची अंत्ययात्रा काढून येवला तहसील आवारात सरण रचून शासनाचा निषेध केला. अधिकाºयांशी चर्चेत कोणताही तोडगा निघत नाही असे दिसून आल्यावर शेतकरी झुंजारराव देशमुख यांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच सावरल्याने पुढील अनर्थ टळला. सायंकाळी उशिरापर्यंत पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला झालेले नव्हते. आंदोलनात बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
श्रावण शिंदे, दीपक वाकचौरे, अजित सोनवणे, एकनाथ जाधव, भारत देशमुख, शेखर चाकणकर, शिवाजी शिंदे, कैलास दाभाडे, बालनाथ गोसावी, निवृत्ती बोर्डे, अनिल बोराडे, अमर लिंगायत, संतोष देशमुख, योगेश देशमुख, मुकेश देशमुख, शिवाजी देशमुख, बाळू सोनार, सचिन देशमुख, दीपक देशमुख आदी शेतकरी यावेळी सामील झाले होते.