शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाच्या केंद्रात मका विक्रीसाठी आणावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:40 PM2018-11-28T17:40:50+5:302018-11-28T17:41:08+5:30

सिन्नर : शासकीय हमीभावाने मक्याची खरेदी होत असल्याने शेतकºयांचा ४०० ते ५०० रूपये वाढीव दर खाजगी व्यापाºयांपेक्षा अधिक मिळणार आहे.

Farmers should bring the maize to the center of the buying and selling center | शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाच्या केंद्रात मका विक्रीसाठी आणावा

शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाच्या केंद्रात मका विक्रीसाठी आणावा

Next

सिन्नर : शासकीय हमीभावाने मक्याची खरेदी होत असल्याने शेतकºयांचा ४०० ते ५०० रूपये वाढीव दर खाजगी व्यापाºयांपेक्षा अधिक मिळणार आहे. खरेदी-विक्री संघाच्या केंद्रात तालुक्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात मका नोंदणी करून हमी भावाने पैसे मिळण्यासाठी संघाकडे मका विक्र ीसाठी आणावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.
तालुक्यातील वावी येथे तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने शासकीय हमीभावाने मका खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सांगळे बोलत होत्या. यावेळी संघाचे अध्यक्ष वसंत आव्हाड, उपाध्यक्ष छबू थोरात, संचालक नामदेव सांगळे, नितीन अढागळ, सुकदेव वाजे, व्यवस्थापक संपत चव्हाणके, दत्ता राजेभोसले, मंडळ अधिकारी व्ही. व्ही. गोसावी आदी उपस्थित होते. पणन महासंघाच्या वतीने दरवर्षी शेतकºयांना दिलासा देण्यासाठी व शासकीय हमी भावाने माल खरेदी करून शेतकºयांना फायदा होण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. खरेदी-विक्री संघाने एक नोव्हेंबर पासून मका या पिकाची आॅनलाईन नोंदणी त्यांच्या कार्यालयामार्फत केली आहे. २६ नोव्हेंबर पर्यंत २६७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. मागील वर्षी ४५२ शेतकºयांनी नोंदणी केली होती. संघाच्या वतीने १२ हजार ८३३ क्विंटल मका खरेदी शेतकºयांकडून केली होती. मका खरेदी जरी सुरु असली तरी शेतकºयांनी मका पिकाची नोंदणीसाठी कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. पंचाळे येथील विठ्ठल कोंडाजी गुंजाळ या शेतकºयाची मका प्रथम खरेदी करण्यात आली. संघाच्या वतीने १० मजूर काटा करणे, कट्टे उचलणे, थप्पी मारणे यासाठी तैनात करण्यात आले आहे. वावी येथील बाजार समिती गोडाऊन मध्ये केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी संघाचे पदाधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers should bring the maize to the center of the buying and selling center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार