शेतकऱ्यांनी खत वापराच्या पर्यायांची शक्यता पडताळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:48+5:302021-04-29T04:11:48+5:30
भात, सोयाबीन, कापूस व ऊस या प्रमुख पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात व असंतुलितरित्या केला जातो. त्यामुळे ...
भात, सोयाबीन, कापूस व ऊस या प्रमुख पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात व असंतुलितरित्या केला जातो. त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात किंवा शिफारशीनुसार खतमात्रा पिकांना उपलब्ध होत नाही. परिणामी पीक उत्पादन खर्चात वाढ होऊन, निव्वळ उत्पन्न कमी होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी पिकांकरिता कृषी विद्यापीठांच्या शिफारशीत खतमात्रांचा अवलंब शेतकऱ्यांकडून होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने रासायनिक खतांचा संतुलित वापर होण्यासाठी तसेच विविध खत बचतीच्या उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने राज्यात खरीप हंगामात खतांच्या बचतीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
चौकट
बियाणे बदलू नका
सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक आहे. या पिकाचे सरळ वाण असल्यामुळे दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे हे पुढील दोन वर्षापर्यंत वापरात येते असेही विभागीय कृषी अधिकारी देवरे यांनी सांगितले.