शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:04 AM2021-07-13T04:04:25+5:302021-07-13T04:04:25+5:30
सिन्नर : शेतकऱ्यांसाठी मुबलक प्रमाणात युरिया मिळावा तसेच शासनाचा युरिया बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी खुला करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन ...
सिन्नर : शेतकऱ्यांसाठी मुबलक प्रमाणात युरिया मिळावा तसेच शासनाचा युरिया बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी खुला करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाच्यावतीने खासदार हेमंत गोडसे यांना देण्यात आले.
ऐन खरिपाच्या तोंडावर युरिया खताची मागणी वाढली असून युरिया खत पुरवठा मुबलक प्रमाणात नसल्याने तो तातडीने मिळावा, जिल्हा बँकेत संघाची अडकलेली रक्कम मिळावी, दूरसंचारकडील वडांगळी येथील गोडाऊनचे थकीत भाडे मिळावे, खत साठविण्यासाठी गोडाऊन खाली करून मिळावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी संघाचे चेअरमन कचरू गंधास, व्हाईस चेअरमन छबू थोरात, संचालक आर. आर. जाधव, फकीरराव हिरे, दत्तू आव्हाड, वसंतराव आव्हाड आदी उपस्थित होते.
फोटो - १२सिन्नर गोडसे
शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया मिळावा आणि अन्य मागण्यांचे निवेदन खासदार हेमंत गोडसे यांना देताना खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष कचरू गंधास, छबु थोरात, आर. आर. जाधव आदी.
120721\12nsk_9_12072021_13.jpg
शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया मिळावा आणि अन्य मागण्यांचे निवेदन खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन देताना खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष कचरु गंधास, छबु थोरात, आर. आर. जाधव आदी.