शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 03:09 PM2019-11-11T15:09:53+5:302019-11-11T15:10:05+5:30
पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभे राहण्याची गरज आहे. सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. सोमवारी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील शिरवाडे वणी येथील रतन हरी निफाडे यांच्या नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी शेट्टी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रांतिक सदस्य साहेबराव मोरे, उत्तर महाराष्ट्र सचिव सोमनाथ बोराडे, प्रवक्ते संदीप जगताप, जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, जिल्हा कार्याध्यक्ष निवृत्ती घारे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब तास्कर, दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन कड आदी उपस्थित होते.
परतीच्या पावसामुळे शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. कारण नुकसान लाखोंच्या पटीने आहेत जर या शेतकºयांना दिलासा द्यायचा असेल तर ज्या पद्धतीने महापुराच्या वेळी जो निर्णय सरकारने घेतला होता. त्याच पद्धतीने आता परतीच्या मान्सूनमूळे ज्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांवर काढलेल्या पीक कर्ज माफ केले पाहिजे व ज्या शेतकºयांनी पीक कर्ज काढलेले नाही. त्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापकाच्या तिप्पट रक्कम दिली पाहिजे .ज्या शेतकºयांनी पिकविम्यासाठी पैसे भरले आहे.त्या शेतकºयांना विम्याचा क्लेम देण्याच्या संदर्भात ताबडतोब सांगितले पाहिजे असे झाले तर शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो. अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल सरकार कोणाचेही पक्षाचे येवो हे करावाच लागणार आहे नाहीतर पुढच्या काही काळात संपूर्ण महाराष्ट्रभर आत्महत्यांचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी शेट्टी म्हणाले. यावेळी शेतकरी शरद काळे , संजय निफाडे ,शिवराम रसाळ ,शरद निफाडे , अरूण निफाडे, रामदास काळे, किरण निफाडे ,नंदू निफाडे ,महेश काळे, नितीन निखाडे ,नामदेव वाटपाडे ,उत्तमराव निफाडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.