शेतकऱ्यांनी संघटित होऊन तंत्रज्ञानाची वाट धरावी : विलास शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:46+5:302021-05-14T04:15:46+5:30
स्व. मुळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिंदे यांनी तेरावे पुष्प गुंफले. या दरम्यान त्यांनी शेतकरी विधेयक आणि सरकार, तसेच पक्षीय ...
स्व. मुळचंदभाई गोठी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिंदे यांनी तेरावे पुष्प गुंफले. या दरम्यान त्यांनी शेतकरी विधेयक आणि सरकार, तसेच पक्षीय भूमिकेकडे लक्ष वेधले.
प्रत्येक राज्यातील भौगोलिकता वेगळी असून, पारंपरिक पिकांची स्थितीही निराळी आहे. त्यामुळे उत्तर भारत आणि दक्षिण पट्ट्यातील शेतकऱ्यांची भूमिका वेगळी आहे आणि प्रत्येकाची भूमिका राजकीय तऱ्हेने ठरत असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.
गेल्या पन्नास वरिष्ठ बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. त्यास ब्रेक मिळणे आवश्यक आहे. उत्पादन खर्च धरून शेतमालास दाम मिळण्याची गरज असल्याचे सांगून शरद जोशी हे मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणारे एकमेव नेते होते. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यास ताकद देताना गुंतवणूक सरकारने करावी. मात्र, सरकारी धोरणानुसार शेती भांडवलदारांकडे गेल्यास शेतकरी नागवला जाईल, अशी भीतीही शिंदे यांनी व्यक्त केली.
शाश्वत व्यवस्था नसल्याने आपली व्यवस्था आपणच उभी करण्याची गरज आहे, तरच जगाच्या बाजारपेठेत सिध्द होऊ.
त्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची वाट धरावी, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी नामको बँकेचे संचालक अविनाश गोठी उपस्थित होते.
मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.
छायाचित्र आर फोटोवर
===Photopath===
130521\13nsk_43_13052021_13.jpg
===Caption===
विलास शिंदे