पांढुर्लीत कांदा खरेदी लिलावाचा शुभारंभ शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : पहिल्याच दिवशी ९०० गोण्यांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:15 AM2018-04-06T00:15:01+5:302018-04-06T00:15:01+5:30
सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात कांदा खरेदी लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी विक्रीसाठी शेतकºयांनी सुमारे ९०० गोण्या कांदा आणला होता.
सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात कांदा खरेदी लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी विक्रीसाठी शेतकºयांनी सुमारे ९०० गोण्या कांदा आणला होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी लिलावास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते व बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. पांढुर्ली उपबाजारात यापुढे दर सोमवार, बुधवार व शुक्र वार असे तीन दिवस कांदा शेतमालाचे लिलाव सुरू राहणार आहेत. लिलावाच्या शुभारंभप्रसंगी ९०० कांदा गोण्यांची आवक झाली व त्यास ७०० ते ११२५ असा प्रतिक्विंटल भाव मिळाला. अमृता भिका गाढवे या शेतकºयाच्या ४० गोण्यांना ११११ रुपये बाजारभाव मिळाला. सरासरी बाजारभाव ९०० रूपये राहिले. यावेळी माजी उपसभापती सोमनाथ भिसे, संचालक जगन्नाथ खैरनार, सुनील चकोर, संजय खैरनार, सोपान उगले, सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव, ए. सी. शिंदे, आर. जे. डगळे, एस. के. चव्हाणके, ए. बी. भांगरे, व्ही. बी. मोरे आदी उपस्थित होते. आडत पद्धतीने कांदा खरेदी करण्यासाठी नाशिक येथील व्यापारी नंदलाल जाधव, प्रभाकर हारक, अभिजित सोनवणे, दिलीप सोनवणे, अमोल जाधव, दामू गायधनी, अनंत ठक्कर, गणेश चौधरी, रवि वराडे, रमेश दिवटे, तुकाराम वाजे, बाळासाहेब मोगले, श्याम कोकाटे, फुलचंद यादव, निवृत्ती तुपे, उत्तम पालवे, चंद्रभान वाजे, बाळासाहेब चौघुले, सुकदेव वाजे, विकास वाजे, तुषार मोजाड, कांडेकर, योगेश बोºहाडे यांनी लिलावात बोली लावून कांदा शेतमाल खरेदी केला. कांदा शेतमाल विक्रीसाठी तानाजी पवार, तानाजी आंबेकर, आप्पा जाधव, रंगनाथ बरतड, भास्कर डगळे, तानाजी पवार, रामनाथ बोºहाडे, अंंबादास झाडे, दत्ता वाजे, अर्जुन हगवणे, अमृता गाढवे, तुकाराम जाधव, संजय पवार, श्रीपत मोजाड, शिवाजी तुपे, नितीन डावरे, संजय मोरे, दीपक डांगे, निवृत्ती पवार, रतन डावरे, संतोष पवार, हिरामण मंडलिक, पंढरीनाथ हारक, खंडू वाजे, बाळासाहेब भोर, अनिल शेळके या शेतकरी बांधवांनी आपला कांदा शेतमाल पांढुर्ली उपबाजार आवारात विक्री केला.