पीककर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

By admin | Published: April 13, 2017 12:10 AM2017-04-13T00:10:44+5:302017-04-13T00:10:59+5:30

पीककर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

Farmers' Stretches for Peanuts | पीककर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

पीककर्जासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

Next

नाशिक : जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज मिळत नसलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. १२) जिल्हा बॅँकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. कर्जाची परतफेड केल्यानंतरही कर्ज मिळत नसल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली.
ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली आहे त्या शेतकऱ्यांना २५ एप्रिलपर्यंत कर्ज पुरवठा केला
जाईल, असे आश्वासन अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिले.यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. जिल्हा विविध विकास सेवा सहकारी सोसायटी संघटनेच्या वतीने जिल्हा बॅँकेतील सभागृहात हे आंदोलन करण्यात आले. ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे जिल्हा बॅँकेने आवाहन केले, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज भरले. परंतु, कर्ज भरणा होऊनदेखील कर्ज पुरवठा का केला जात नाही अशी विचारणा शेतकऱ्यांनी केली. यावर बॅँकेचे कार्यकारी संचालक यशवंत शिरसाठ यांनी कर्ज पुरवठ्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्र मक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट ठिय्या मांडला. कर्ज द्या नाहीतर, खुर्च्या खाली करा अशी घोषणबाजी केली. बॅँकेचे काय झाले ते सांगू नका आधी कर्ज कधी देणार असे सांगा,अशी भूमिका घेत शेतकऱ्यांना शिरसाठ यांना धारेवर धरले. शिरसाठ यांना घेराव घालीत गोंधळ सुरू केला. या गोंधळात बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे सभागृहात दाखल झाले. अध्यक्ष दराडे दाखल झाल्यानंतर, शेतकऱ्यांनी बॅँकेच्या परिपत्रकानुसार ३१ मार्चपयॅँत कर्जफेड करणाऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा करावा. हे कर्ज २५ एप्रिलपूर्वीच मंजूर करावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी राज्य बॅँकेतील ठेवी मुक्त करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज दिले जाणार असल्याचे आश्वासन दराडे यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी संचालक संदीप गुळवे, गणपतराव पाटील, संघटनेचे निमंत्रक राजू देसले, विष्णूपंत गायखे, सुरेश रायते, अशोक आडके, संपतराव वक्ते, राजराम रायते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, ज्ञानेश्वर साळवे, शांताराम नागरे, किरण धात्रक, शशिकांत साळवे, कैलास ताजनपुरे, नामेदाव बोराडे, रमेश जेजुरकर, मधुकर शिंदे, विलास कडभाने, शंकर वायचळे, भास्कर उगले, ज्ञानेश्वर गायधनी, किरण गायधनी, तुकाराम शिंदे आदि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers' Stretches for Peanuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.