शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: July 10, 2017 12:09 AM2017-07-10T00:09:45+5:302017-07-10T00:10:06+5:30
दिंडोरी : वरवंडी येथील बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळला असून,शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : तालुक्यातील वरवंडी येथील बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला असून, सदर शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथील सुदाम राजाराम जाधव (३८) हे शुक्र वार, दि. ७ पासून घरातून बेपत्ता झाले होते. ते बेपत्ता झाल्याची तक्र ार म्हसरूळ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. रविवार, दि. ९ रोजी सकाळी त्यांचे भाऊ विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले असता सुदाम यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांना याबाबत खबर देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, सदर शेतकऱ्यावर सोसायटीचे सुमारे दोन लाख, तर कुटुंबातील वडील, आई व भाऊ यांचे नावे सुमारे चार लाख थकीत कर्ज आहे. शेतीच्या भांडवलासाठी त्यांची परवड झाली होती. सदर शेतकऱ्याच्या जिल्हा बँकेच्या खात्यावर ७५ हजार होते. मात्र तेथून पैसे मिळत नसल्याने ते आर्थिक विवंचनेत असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप वाकचौरे, हवालदार सुनील भुसाळ, रतन पगार, नीलेश दिवटे, सुनील आहेर, मच्छिन्द्र कांगने, राजू भोये, राजेंद्र शेवरे करत आहे