बागलवाडी येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या
By admin | Published: June 25, 2016 11:54 PM2016-06-25T23:54:32+5:302016-06-26T00:24:17+5:30
गुन्हा दाखल : जमीन विक्रे त्या कुटुंबाकडून होता मानसिक त्रास
निफाड : तालुक्यातील बागलवाडी येथे खरेदी केलेली जमीन नावावर करण्यास टाळाटाळ होत असल्याने व त्याबाबत विक्रेत्या शेतकरी कुटुंबाकडून सतत होणाऱ्या मानिसक त्रासाला कंटाळून बागलवाडी येथील शांताराम नथुजी वाजे (६०) या शेतकऱ्याने (दि. २५) सकाळी ६ वाजेपुर्वी राहात्या घरात फाशी घेऊन आत्महत्त्या केली असल्याची फिर्याद मयत शेतकऱ्याच्या मुलाने सायखेडा पोलीस ठाण्यात दिली आहे.
सायखेडा पोलीस ठाण्यात नितीन शांताराम वाजे यांनी फिर्याद दाखल केली आहे नितीन वाजे यांच्या फिर्यादीवरून दिलीप काशिनाथ बागल, शोभा दिलीप बागल, रोशन दिलीप बागल, नामदेव नंदू माने या चारही संशियत आरोपि विरोधात शांताराम वाजे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, माझे वडील मयत शांताराम वाजे यांनी संशियत आरोपी दिलीप बागल यांचे वडील काशिनाथ गेणु बागल यांच्याकडून पत्नी रेखा वाजे यांच्या नावे बागलवाडी शिवारात शेत गट नंबर २१० मध्ये ५४ गुंठे जमीन साठेखताने खरेदी केली होती. तिचेवर भूविकास बँकेचे कर्ज असल्याने अद्याप नावे झाली नाही. काशिनाथ बागल हे मयत झाल्यावर वरील चारही संशियत आरोपींनी सदर जमीन नावे देण्यास नकार देऊन उलट तुम्हाला जमीन नावे करून देणार नाही. ती आमची आहे. आम्हाला अजून पैसे पाहिजे असे म्हणून सन २००८ पासून सतत शांताराम वाजे यांना त्रास देवून शिविगाळ दमदाटी करून मानिसक त्रास देत होते. त्या त्रासाला कंटाळून शांताराम वाजे यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शांताराम वाजे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वरील चारही संशियत आरोपिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन ईमले, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक केदारे करीत आहेत. (वार्ताहर)