मांजरपाडा बोगद्यात उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:45 AM2018-07-20T01:45:39+5:302018-07-20T01:46:59+5:30
नाशिक : मांजरपाडा प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बोगद्याच्या कामामुळे विहिरीचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी यासाठी पाच वर्षांपासून प्रशासन दरबारी खेटा मारणाºया शंभर मंगा गायकवाड या शेतकºयाने नैराश्येतून बोगद्यासाठी खोदण्यात आलेल्या १८० फूट विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविलीे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून, बोगदा खोल असल्यामुळे मृतदेहाचा शोध घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दिंडोरी तालुक्यातील सारसाळे या गावापासून १५० मीटर अंतरावर मांजरपाडा प्रकल्पासाठी विहिरी खोदून त्यातून बोगदा खोदकाम सुरू होते. या खोदकामापासून २५० मीटर अंतरावर गायकवाड यांच्या सारसाळे शेत गट क्रमांक ६४ मध्ये विहीर असल्याने खोदकामासाठी वापरण्यात आलेल्या भूसुरुंगामुळे शेतातील विहीर पडल्याची त्यांची तक्रार होती. याची
दखल घेऊन बांधकाम विभाग व तहसील कार्यालयाने गायकवाड यांच्या
विहिरीची पाहणी केली. कामामुळे घरांना तडे गेल्याचे वा विहीर पडल्याचे दिसत नसल्याचा अहवाल दिला, तर तलाठ्याने अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल दिल्याने गायकवाड भरपाईची मागणी करीत होते.
गेल्या वर्षी त्यांनी प्रांताकडे अर्ज करून भरपाईची मागणी केली. ठेकेदाराने त्यांना ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवून पैसेही दिले होते. मात्र गायकवाड यांचे समाधान झाले नाही, म्हणून त्यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचे प्रयत्न केले. त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल झाली होती. गायकवाड यांनी बोगद्याजवळची वायर कापून कामबंद पाडले होते. परंतु त्याची मागणी मान्य होत नसल्याने ते नैराश्येत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली.