विषारी औषध घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:13 AM2019-10-21T00:13:18+5:302019-10-21T00:36:19+5:30
कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
देसराणे : कळवण तालुक्यातील मोकभणगी येथील शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भगवान त्र्यंबक शेवाळे (४५) या शेतकºयाने गुरु वारी (दि.१७) रात्री आपल्या शेतातील घरात विषारी औषध सेवन केले. त्यांच्या कुटुंबीयांना ही बाब लक्षात येताच त्यांना कळवण येथील उपजिल्हा रु ग्णालयात प्रथमोपचार केले, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्याग्रस्त शेतकरी भगवान शेवाळे यांच्यावर मोकभणगी सोसायटीचे पीककर्ज व मध्यम मुदत असे एकूण १४ लाख ३७ हजार ६७५ रुपयांचे कर्ज होते, अशी माहिती त्यांचे बंधू मनोहर शेवाळे यांनी दिली.