कर्जाला कंटाळून मालेगावी दोघा शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 02:00 AM2019-07-13T02:00:59+5:302019-07-13T02:01:21+5:30
नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील अपंग शेतकरी बापू चिंधा अहिरे (५३) व विराणे येथील माणिक तानाजी पगार (४८) या दोघा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मालेगाव/सोयगाव : नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील अपंग शेतकरी बापू चिंधा अहिरे (५३) व विराणे येथील माणिक तानाजी पगार (४८) या दोघा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आतापर्यंत तालुक्यातील ११ शेतकºयांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत.
तळवाडे येथील बापू अहिरे या दोन्ही पायांनी अपंग शेतकºयाकडे सिंडीकेट बॅँकेचे तीन लाख व सोसायटीचे २५ हजारांचे कर्ज थकीत होते. मध्यवर्ती बॅँकेने सोसायटीमार्फत १० हजारांचे कर्ज दिले होते. थकीत रक्कम २५ हजारापर्यंत गेली. कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळाला नाही. यासंबंधी त्यांनी दाद मागितली. खासगी बॅँकेने घरबांधणी व कर्जाची रक्कमही थकीत होती. या विवंचनेतून बापू यांनी आत्महत्या केल्याचे त्याचे वडील चिंधा अहिरे यांनी सांगितले. (पान ५ वर)
गुरूवार (दि. ११) रात्री अकरावाजेच्या सुमारास बापु अहिरे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्यावर शुक्रवारी अत्यंसंस्कार करण्यात आले. मंडल अधिकारी आर. जी. शेवाळे, तलाठी सुदाम हिरे यांनी अहिरे कुटुंबियांची भेट घेऊन पंचनामा केला. तहसिल कार्यालयात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
ईन्फो
अन्य घटनेत तालुक्यातील विराणे येथील अल्पभुधारक शेतकरी माणिक तानाजी पगार यांनी (४८) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या नावावर ०.२५ आर शेती आहे. उसनवार घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करायची या विवंचनेतुन त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. येथील तहसिलकार्यालयात शेतकरी आत्महत्येची प्राथमिक नोंद घेण्यात आली आहे.
फोटो : 12े्न४’01.्नस्रॅ बापू अहिरे