ट्रॅक्टरद्वारे पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:00+5:302021-06-16T04:19:00+5:30
पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी वाघ सिन्नर: अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या सिन्नर तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब वाघ यांची निवड ...
पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी वाघ
सिन्नर: अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या सिन्नर तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब वाघ यांची निवड करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर यांनी वाघ यांची निवड केली. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस महिला उपाध्यक्ष अनिता बागड, जिल्हाध्यक्ष किरण देशपांडे, रवींद्र सोनवणे उपस्थित होते. संघटनेच्या अध्यक्षपदी रवींद्र काकड, सचिवपदी कैलास झगडे यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
शिवडे येथे बिबट्याचा धुमाकूळ
सिन्नर: तालुक्यातील शिवडे येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याने रामनाथ खेलूकर यांचे वासरू फस्त केले, तर नवनाथ हारक यांच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी सरपंच प्रभाकर हारक, ग्रामपंचायत सदस्य योगिता उत्तम हारक यांनी वनविभागाकडे केली आहे.
वडांगळी येथे वृक्षारोपणाच्या कामास वेग
सिन्नर: तालुक्यातील वडांगळी ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या वृक्षारोपण उपक्रमास वेग आला आहे. वडांगळी ग्रामपंचायतीने २,१०० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वृक्षारोपणासाठी रोख वर्गणी दिली आहे. सुमारे पाच लाख रुपयांच्या किमतीची झाडे लावण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांचे डोळे लागले आभाळाकडे
सिन्नर : या वर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. परंतु मृग नक्षत्र लागून सात दिवसांचा कालावधी लोटला, तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत. त्यामुळे शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला पाऊस आला. त्यामुळे शेतकरी बी-बियाण्यांच्या जुळवाजुळवीला लागला होता. मात्र, अद्याप पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.