शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टमाटे, कांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:32 AM2018-06-02T01:32:58+5:302018-06-02T01:32:58+5:30

येथील शेतकºयांनी रस्त्यावर टमाटे व कांदे फेकून सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. सध्या बाजारात शेतकºयांच्या कोणत्याही शेतमालाला भाव नसल्याने कवडीमोल भावाने शेतमाल विकला जात आहे. तेव्हा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे.

Farmers thrown on the road tomatoes, onions | शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टमाटे, कांदे

शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टमाटे, कांदे

googlenewsNext

खामखेडा : येथील शेतकºयांनी रस्त्यावर टमाटे व कांदे फेकून सरकारचा निषेध व्यक्त करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. सध्या बाजारात शेतकºयांच्या कोणत्याही शेतमालाला भाव नसल्याने कवडीमोल भावाने शेतमाल विकला जात आहे. तेव्हा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे.  शेतकºयांनी १ जूनपासून कोणताही शेतमाल बाजारात विक्रीसाठी न नेता १ ते १० जूनपर्यंत संप पुकारला आहे. तेव्हा देवळा तालुक्यातील खामखेडा येथील महामार्ग क्रमांक १७वर खामखेडा येथील चौफुलीवर शेतकºयांनी रस्ता रोको करून रस्त्यावर टमाटे व कांदे फेकून शेतकºयांनी संताप व्यक्त करण्यात शेतकरी संपात सहभाग नोंदवून राज्य शासनाच्या निषेर्धात घोषणाबाजी करत संपाला पाठिंबा देण्यात आला.  यावेळी वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील, माजी सरपंच दादाजी बोरसे, संतोष मोरे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष रवींद्र शेवाळे, विश्वास शेवाळे, शांताराम शेवाळे, बाळू मोरे, अरुण शेवाळे, गणेश कासार, शंकर सूर्यवंशी, सुरेश शेवाळे, कारभारी शेवाळे, नरेंद्र सोनवणे व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
डेअरी बंद ठेवून पाठिंबा
ब्राह्मणगाव : शेतमालास भाव व कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, स्वामिनाथन आयोग लागू करा या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलनास येथील दूध उत्पादकांनी दूध डेरी बंद ठेवून पाठिंबा दिला. सकाळी अनेक दूध उत्पादक एकत्र आले होते. सध्या शेतमालामंध्ये कांदा, टमाटा, मिरची, कोबी व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे तर शेतकरी आत्महत्या न थांबता दररोज वाढत आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकार याबाबत कठोर पावले उचलत नसल्याने शेतकºयांनी पुन्हा आंदोलनाचे पाऊल उचलले आहे.

Web Title: Farmers thrown on the road tomatoes, onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी