कळवणला जिल्हा बॅँकेकडून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:15 AM2018-03-17T01:15:37+5:302018-03-17T01:16:12+5:30
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी थकबाकी वसुलीसाठी कडक धोरणांचा अवलंब केल्याने थकबाकी वसुली अधिकारी व कर्मचाºयांना यश येत आहे. या मोहिमेंतर्गत कळवण तालुक्यात ६० ट्रॅक्टर जप्त करण्यात येऊन त्यात २९ थकबाकीदारांकडून १ कोटी २० लाख रु पयांची थकबाकी वसूल करण्यात आली होती. जप्त केलेल्या ३१ पैकी २२ ट्रॅक्टरचा लिलाव करून ८० लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली. ६० ट्रॅक्टर जप्तीतून २ कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाल्याने तालुक्यातील अन्य थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.
कळवण : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी थकबाकी वसुलीसाठी कडक धोरणांचा अवलंब केल्याने थकबाकी वसुली अधिकारी व कर्मचाºयांना यश येत आहे. या मोहिमेंतर्गत कळवण तालुक्यात ६० ट्रॅक्टर जप्त करण्यात येऊन त्यात २९ थकबाकीदारांकडून १ कोटी २० लाख रु पयांची थकबाकी वसूल करण्यात आली होती. जप्त केलेल्या ३१ पैकी २२ ट्रॅक्टरचा लिलाव करून ८० लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली. ६० ट्रॅक्टर जप्तीतून २ कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाल्याने तालुक्यातील अन्य थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकी वसुलीसाठी संबंिधतांची ट्रॅक्टरसह वाहने, मालमत्ता जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. याविरोधात गुरुवारी जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयाला कुलूप लावण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयत्न केला होता. शेतकºयांचे ट्रॅक्टर लिलाव थांबवून ट्रॅक्टर परत करावे यासह इतर मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्याने कळवण येथे ट्रॅक्टर लिलाव होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र विरोध झुगारून अध्यक्ष केदा अहेर यांनी लिलाव करण्याच्या सूचना केल्याने शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टरचे लिलाव होऊन ८० लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली. थकबाकी वसुली करण्यासाठी तालुक्यातील सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचाºयांनी कडक पावले उचलावीत, अडचण आल्यास मला फोन करावा व मार्चअखेरीस थकबाकी वसुली करावी अशा सूचना अहेर यांनी दिल्याने गावोगावी जिल्हा बॅँक थकबाकी वसुली पथकांच्या माध्यमातून ६० ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते. २९ ट्रॅक्टर थकबाकीदारांनी एक कोटी २० लाख रुपयांची थकबाकी भरल्याने ते ट्रॅक्टर सोडून देण्यात आले. उर्वरित ३१ ट्रॅक्टरपैकी २२ ट्रॅक्टरचा कळवण येथे जाहीर लिलाव करण्यात येऊन त्या लिलावातून ८० लाख रु पयांची थकबाकी वसूल करण्यात आली, तर उर्वरित ९ ट्रॅक्टरचे फेरलिलाव करण्यात येणार असल्याचे विभागीय अधिकारी जयवंत बोरसे यांनी सांगितले.ट्रॅक्टर लिलाव प्रक्रियेप्रसंगी नाशिक कार्यालयाचे पी. एम. ढगे, के. पी. कदम, कळवणचे विभागीय अधिकारी जे. व्ही. बोरसे, वसुली अधिकारी योगेश मालपुरे, नीलेश पगार, आर. एन. बोरसे, बी. एन. चव्हाण, गोकुळ जगताप, गौरव वाघ, तालुक्यातील शाखा व्यवस्थापक व कर्मचारी आदी उपस्थित होते.
... तर थकबाकीदारांवर गुन्हे
वसुली मोहीम तीव्र करण्यात येणार असून, कलम १०१ च्या दाखल्यानुसार कर्जाने घेतलेले ट्रॅक्टर जप्त करायला गेल्यास ट्रॅक्टर किंवा अन्य वाहन जागेवर नसल्यास संबंधित थकबाकीदारांवर गुन्हा दाखल करावा. ज्या थकबाकीदार सभासदांवर जप्ती बोजे लागले असतील व ते सभासद कर्ज फेडत नसतील तर निबंधक कार्यालयात प्रकरणे दाखल करावे. निकालानंतर संबंधित थकबाकीदाराच्या सातबारा उताºयावर जिल्हा बॅँकेचे नाव लावावे. वाहन कर्जवसुलीसाठी गेल्यावर वाहन जागेवर न सापडल्यास पंचनामा करून थकबाकीदाराविरु द्ध ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा आदी अशा सूचना अध्यक्ष केदा अहेर यांनी वसुली पथकाला केल्या आहेत.