वावी कृषी मंडल कार्यालय सुरू न झाल्याने शेतकरी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:16 AM2021-08-23T04:16:34+5:302021-08-23T04:16:34+5:30
पाच वर्षांच्या कामकाजाच्या लेखा परीक्षणाची मागणी सिन्नर : तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांची भेट घेऊन पाच ...
पाच वर्षांच्या कामकाजाच्या लेखा परीक्षणाची मागणी
सिन्नर : तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांची भेट घेऊन पाच वर्षांच्या कामकाजाच्या लेखा परीक्षणाच्या अहवालाची मागणी केली. तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेत भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जयंत आव्हाड, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनवणे, रुपाली काळे, दीपाली लोणारे, सुनीता काळोखे मनीषा लोंढे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी निवेदन
सिन्नर : येथील नायगाव रोडवरील साईदत्त नगरमधील साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने वाटसरुंना पायी चालणेही मुश्कील झाले आहे. या भागातील रहिवाशांनी मुख्याधिकारी संजय केदार यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी नामदेव कोतवाल, डॉ. दिलीप गुरुळे, रमेश कानडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
दुसंगवाडी शिवारात वीजपंप चोरी
सिन्नर: तालुक्यातील दुसंगवाडी शिवारातून शेतकऱ्याच्या विहिरीतून अज्ञात चोरट्याने पाच विद्युतपंप चोरुन नेल्याची घटना घडली. नंदू रंगनाथ गोराणे यांच्या विहिरीवरील पाच हजारांची अजिंठा कंपनीची पाच अश्वशक्तीची जलपरी, पाच हजारांची मेघा कंपनीची जलपरी, लक्ष्मी कंपनीची पाच अश्वशक्तीची जलपरी, दहा हजारांचे एक पीटर मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.