कांद्याच्या भाववाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 02:08 PM2018-12-17T14:08:17+5:302018-12-17T14:08:38+5:30
सायखेडा : कवडीमोल भावात विक्र ी होत असलेला कांदा किमान दोन हजार रु पये आणि अनुदान देण्यात यावे यासाठी ...
सायखेडा : कवडीमोल भावात विक्र ी होत असलेला कांदा किमान दोन हजार
रु पये आणि अनुदान देण्यात यावे यासाठी नाशिक जिल्ह्यातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतल्याने कांद्याला भाव कधी जाहीर होतो याकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर केंद्र सरकार कांद्याला चांगला भाव देईल अशी अपेक्षा शेतकºयांना होती मात्र लाल कांद्याचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटूनही केवळ चार ते पाच रु पये प्रति किलो भाव मिळत असल्याने खर्च सुद्दा वसूल होत नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी संतापले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने झाले तरीही भाव वाढ झाली नाही. मागील आठवड्यात झालेल्या अनेक राज्यात भाजप पक्षाला दणका बसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार भाववाढ करील अशी अपेक्षा शेतकºयांना आहे. शेतकºयांना मात्र भोळी आशा लागल्याने शेतात काढून पडलेला कांदा विक्र ीसाठी थांबून आहे तर अनेक शेतकरी शेतात काढण्यासाठी आलेला कांदा काढण्यास थांबले आहे. कांद्याला भाव वाढण्याकडे शेतकरी लक्ष लावून बसले आहेत.
-----------------------
कांद्यासाठी एकरी पन्नास हजार रु पये खर्च झाला आहे. आज केवळ वीस ते पंचवीस हजार रु पये उत्पादन त्यातून निघत आहे. खर्च देखील वसूल होत नसल्याने कर्ज वाढत आहे. मुलांचे शिक्षण, कुटुंब खर्च, पुढील पीक उभे करण्यासाठी भांडवल सर्व समस्या ठाण मांडून समोर उभ्या असल्याने व्यवहारिक जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे.
-दर्शन केंगे, शेतकरी, पिंपळस
------------------
जिल्ह्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याने कांद्याच्या भावात सुधारणा होऊन चार पैसे शेतºयांना मिळतील अशी आशा आहे. ही केवळ भोळी आशा ठरू नये. भाववाढीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा आहे.
- धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगव