शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 11:48 PM2021-07-13T23:48:01+5:302021-07-14T00:43:02+5:30

ब्राह्मणगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या असून, बळीराजा चिंतित पडला आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिन्यानंतर जुलै महिनाही अर्धाअधिक संपत आला असून परिसरात अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असून, अद्याप बऱ्याच मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत. महाराष्ट्रात अन्य ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असले तरी बागलाण तालुक्यातील पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.

Farmers wait for rain | शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देअद्याप बऱ्याच मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत.

ब्राह्मणगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या असून, बळीराजा चिंतित पडला आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिन्यानंतर जुलै महिनाही अर्धाअधिक संपत आला असून परिसरात अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असून, अद्याप बऱ्याच मोठ्या प्रमाणात पेरण्या खोळंबल्या आहेत. महाराष्ट्रात अन्य ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असले तरी बागलाण तालुक्यातील पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.

आधीच कोरोनाने पिचलेल्या अर्थ व्यवस्थेने शेतकरी वर्गासह अन्य वर्गही बेजार झाले आहेत. सध्यातर मजुरांचे हातांनी काम नाही. त्यातच पेट्रोल डिझेलचे दररोज भाववाढ होत असून, महागाई त त्यामुळे वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. आत्ता वेळेवर पाऊस आला म्हणजे पेरण्या सुरू होतील, त्यामुळे किमान रोजगार तरी उपलब्ध होऊन घर प्रपंच चालविण्यासाठी मदत होणार आहे.

मात्र वातावरणात मोठा उष्मा असतानाही दररोज पाऊस हुलकावणी देत असल्याने सर्वत्र चिंतेचे सावट आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी विहिरीतील उपलब्ध पाण्यावर जमिनी ओलवून मका पेरणी केली असून तेही वरच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Farmers wait for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.