देवळा तालुक्यात खरीप पूर्व मशागतीची कामे उरकून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 07:22 PM2019-06-06T19:22:21+5:302019-06-06T19:23:27+5:30
देवळा : देवळा तालुक्यात गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकर्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला होता. चालू वर्षी तरी वरूणराजा वेळेवर बरसेल व हे वर्ष चांगले जाईल ह्या अपेक्षेने शेतकरी वर्ग खरीप पूर्व मशागतीची कामे पूर्ण करून पावसाची प्रतिक्षा करीत आहे

हया वर्षी पावसाचे आगमण थोडे उशीराने होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकर्यांच्या काळजीत भर पडली आहे. असे असले तरी हिरमोड होऊ न देता उत्साहाने खरीप पूर्व मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करून शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत.
शेती करतांना मजुरांच्या टंचाईमुळे शेतकर्यांचा कल ती यांत्रिकीकरणाने करण्याकडे वाढू लागला आहे. बैलांच्या किंमती सर्वसामान्य शेतकर्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे अनेक शेतकर्यांना बैलजोडी ठेवणे परवडत नाही. त्यातच शेतीचे क्षेत्र प्रत्येक पिढीत होणारी वाटे हिश्यांची खाते फोड यामुळे कमी कमी होत चालले असून अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकर्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ह्या शेतकर्यांना बैलजोडी ठेवून त्यांची देखभाल करणे व्यावहारीक दृष्टया परवडत नाही. यामुळे शेतकर्यांकडील पशुधनाची संख्या रोडावली आहे. यातून मार्ग काढत दोन शेजारी शेतकरी प्रत्येकी एक बैल ठेवतात व आळीपाळीने आपल्या शेतीची मशागतीची व पेरणीची कामे करून घेतात.