शेतकरी आठवडे बाजार : ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद अवघ्या दोन तासांतच संपतो भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:20 AM2017-12-24T01:20:10+5:302017-12-24T01:20:49+5:30
नाशिक : गेल्या १ डिसेंबरपासून सुरू झालेला शेतकरी आठवडे बाजार संकल्पनेला ग्राहकांनी उचलून धरले असून, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आठवडे बाजारात भाजीपाला हातोहात विकला जात आहे.
नाशिक : गेल्या १ डिसेंबरपासून सुरू झालेला शेतकरी आठवडे बाजार संकल्पनेला ग्राहकांनी उचलून धरले असून, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आठवडे बाजारात भाजीपाला हातोहात विकला जात आहे. अवघ्या दोन अडीच तासांतच बाजार आटोपत असल्याने बाजारात दिवसेंदिवस गर्दी होऊ लागली आहे.
राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद-हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यात आला आहे. दर शुक्रवारी भरणाºया या बाजारात ग्राहकांना थेट शेतातील माल उपलब्ध होत असल्याने ग्राहकांच्या या बाजारावर उड्या पडत आहे. शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विनामध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध झाला आहे. या संकल्पनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याने अवघ्या चौथ्या बाजारातच शेतकºयांचा आठवडे बाजार शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. शुक्रवारी बाजाराचा अवघा चौथा दिवस होता. मात्र दोन-अडीच तासांतच बाजारातील संपूर्ण भाजीपाला माल विकला जात असल्याचा अनुभव शेतकºयांनी सांगितला. स्वस्त, ताजा आणि सेंद्रिय भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची शेतकºयांच्या आठवडे बाजाराला गर्दी वाढली आहे. येथे केवळ शेतकºयांनाच शेतमाल विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच ११ ते २० शेतकºयांनी गट तयार करून पणन मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय पांजरपोळ कोणतेच शुल्क आकारणार नाही. या नोंदणीत आता वाढ झाली असून, विक्रेते शेतकºयांची संख्याही वाढली आहे.
भरेकºयांचा त्रास
व्यापाºयांची मध्यस्थी नसल्याने थेट शेतकरी ग्राहकांपर्यंत पोहचला असल्याने शेतमालाला ग्राहकांकडून चांगली मागणी होऊ लागली आहे. आठवडे बाजारात केवळ गट नोंदणीकृत शेतकरीच भाजीपाला विक्री करू शकत असल्याने ग्राहकांना चांगला भाजीपाला मिळू लागला आहे. परंतु या बाजाराला मिळणारा प्रतिसाद पाहून बाजाराच्या बाहेरच्या बाजूला भरेकरी दुकाने मांडू लागल्याने या भरेकºयांना मज्जाव करण्याचे काम पणन तसेच पांजरापोळच्या कर्मचाºयांना करावा लागत आहे. रस्त्यावर बसणाºया भरेकºयांना हटविण्यासाठी अतिक्रमण विभागाला तैनात करण्यात आले होते. भरेकरी रस्त्यावरच कचरा करीत असल्याने स्थानिक रहिवाशांकडून त्यांना विरोध होत आहे.