शेतकरी आठवडे बाजार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:44 AM2018-01-23T00:44:29+5:302018-01-23T00:44:53+5:30

मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत असताना स्थानिक भरेकºयांनी गेल्या शुक्रवारी बाजारात धुडगूस घातल्याने आता शेतकरी आठवडे बाजार पोलीस संरक्षणात सुरू होणार आहे. मखमलाबादरोडवरील पांजरापोळच्या जागेत गेल्या डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या या बाजाराला भरेकºयांकडून सातत्याने विरोध होत असल्याने बाजाराच्या भवितव्याचा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे.

Farmers' Weekly Market Turnouts | शेतकरी आठवडे बाजार अडचणीत

शेतकरी आठवडे बाजार अडचणीत

Next

नाशिक : मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत असताना स्थानिक भरेकºयांनी गेल्या शुक्रवारी बाजारात धुडगूस घातल्याने आता शेतकरी आठवडे बाजार पोलीस संरक्षणात सुरू होणार आहे. मखमलाबादरोडवरील पांजरापोळच्या जागेत गेल्या डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या या बाजाराला भरेकºयांकडून सातत्याने विरोध होत असल्याने बाजाराच्या भवितव्याचा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे.  राज्य कृषी पणन मंडळ व नाशिक पंचवटी पांजरापोळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने शासनाच्या संत सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियानांतर्गत शहरातील मखमलाबाद - हनुमानवाडी रस्त्यावरील पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ सुरू झाला आहे. शेताच्या बांधावरून शेतकºयांमार्फत विना मध्यस्थ थेट ग्राहकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डिसेंबर २०१७ मध्ये आठवडे बाजार सुरू करण्यात आला. पहिल्याच आठवडे बाजाराला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आठवडे बाजाराची संकल्पना साकार झाल्याचे बोलले जात होते.  मात्र, दुसºया आठवडे बाजारापासून भरेकºयांनी बाजाराच्या आजूबाजूला दुकाने थाटल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पांजरापोळ संस्थेने अतिक्रमण विभागाला पाचारण केले होते. त्यानंतर रस्त्यावरील बाजारातील विक्रेत्यांनी पुढच्या रस्त्यावर बाजार मांडला. गेल्या दोन आठवड्यांपासून सदर प्रकार सुरूच होता. शुक्रवार, दि. १९ रोजी तर परिसरातील भरेकºयांनी थेट शुक्रवार आठवडे बाजारात घुसून बाजार उठविण्याचा प्रयत्न केला. आठवडे बाजारातील विक्रेते हे शेतकरी नसून भरेकरी असल्याचे आरोप करीत भरेकरी बाजारात शिरले होते. त्यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. बाजाराच्या प्रवेशद्वारावर पांजरापोळचे कर्मचारी तैनात असतात, परंतु त्यांना न जुमानता बाहेरील भरेकरी बाजारात शिरले होते. भरेकºयांनी बाजारात घोषणाबाजी आणि हुल्लडबाजी करीत काही शेतकºयांना धमकविण्याचा प्रयत्न केला तसेच काहींना कुठून आले अशी विचारणा करून परत बाजारात न येण्याची धमकी दिल्याचा अनुभव शेतकºयांनी सांगितले. शुक्रवार आठवडे बाजाराला स्थानिक भरेकºयांचा कायमच विरोध राहिला आहे. त्यांनी पहिल्या आठवडे बाजारापासूचन बाजाराच्या बाहेर बसणे, स्थानिक नागरिकांना बाजारात जाण्यापासून रोखणे, रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरू केले होते. त्यामुळे पांजरापोळ आणि पणन महामंडळाला पोलिसांना पाचारण करावे लागले होते.  तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाड्यादेखील तैनात करण्यात आल्या होत्या. एव्हढे उपाय करूनही भरेकºयांनी गोंधळ घातल्याने आता पुढील शेतकरी आठवडे बाजारात पणन महामंडळाचे कर्मचारी, पांजरापोळचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात सुरू होणार आहे. 
शेतकºयांना धमकाविण्याचा प्रयत्न 
स्थानिक भरेकºयांनी आठवडे बाजारात शिरून बाजारातील शेतकºयांना धमकाविण्याचा प्रयत्न केलाच शिवाय त्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना धमकी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. शेतकºयांमध्ये धाक निर्माण करून त्यांना बाजारात येण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न स्थानिक भरेकºयांनी केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने बाजारात शिरलेल्यांना बाहेर काढण्यात आले.

Web Title: Farmers' Weekly Market Turnouts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.