भोजापूर परिसरात शेतकऱ्यांना माफक दरात खते मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 05:40 PM2019-03-08T17:40:01+5:302019-03-08T17:40:17+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चास येथील भोजपूर खोरे डाळिंब उत्पादक कंपनीच्या वतीने भोजापूर खोरे अॅग्री मॉलचा शुभारंभ करण्यात आला. या शेतीमॉल मध्ये शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधे आदी होलसेल दरात मिळणार आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा थेट आर्थिक लाभ होणार आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील चास येथील भोजपूर खोरे डाळिंब उत्पादक कंपनीच्या वतीने भोजापूर खोरे अॅग्री मॉलचा शुभारंभ करण्यात आला.
या शेतीमॉल मध्ये शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधे आदी होलसेल दरात मिळणार आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा थेट आर्थिक लाभ होणार आहे. शेतकºयांच्या हितासाठी अॅग्रो मॉलची स्थापना करण्यात आली आहे. शेतकºयांच्या मालकीचा हा मॉल असल्याने त्याचा परिसरातील शेतकºयांना थेट लाभ होणार असल्याचे भोजापूर खोरे डाळिंब उत्पादक कंपनीचे अध्यक्ष बंडूनाना भाबड यांनी सांगितले. याप्रसंगी माजी सरपंच केरू भाबड, बबन खैरनार, रायगड अॅग्रोचे मालक सागर शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन खैरनार, सोसायटीचे अध्यक्ष आत्माराम बिडगर, रघुनाथ भाबड, जगन्नाथ खैरनार, माजी सरपंच राधाकिसन खैरनार, प्रदीप खैरनार, माजी अध्यक्ष संजय खैरनार, सुभाष भाबड, सचिन बिडगर, बबन भाबड, रामनाथ भाबड, दशरथ खैरनार, कंपनीचे संचालक राजेंद्र शेळके, राजेंद्र सहाणे, रावसाहेब दराडे, अशोक बिडगर, सुनील सांगळे, राजेश भाबड, कंपनीचे कार्यकारी संचालक भीमा मधे, ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.