‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:18 AM2018-05-16T01:18:40+5:302018-05-16T01:18:40+5:30
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातून नाशिक अॅग्रो इंडस्ट्रिज लि.ने कांदा खरेदीपोटी शेतकºयांना दिलेले धनादेश न वटल्याने बाजार समितीने शेतकºयांच्या तक्रारीवरून संबंधित फर्मच्या दोघा कांदा व्यापाºयांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघा व्यापाºयांनी बाजार समितीकडे १६ लाख ३७ हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या ६९ शेतकºयांच्या खात्यावर बुधवारपासून (दि. १७) त्यांची कांद्याची रक्कम मिळणार आहे.

बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी या प्रकरणी ९ मे रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित राजू पठारे व राकेश आढाव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या दोघा संशयितांना अटकही केली होती.
फेब्रुवारी ते मार्च २०१८ या कालावधीत ६३ शेतकºयांना देण्यात आलेले १४ लाख ६३ हजार ७४३ रुपयांचे धनादेश न वटता परत आल्याने शेतकºयांनी बाजार समितीकडे तक्रार केली होती. कांदा व्यापारी राजू सदाशिव पठारे (रा. वाशी, नवी मुंबई) व राकेश भास्कर आढाव (रा. वावीवेस, सिन्नर) या दोघांची नाशिक अॅग्रो नावाने नोंदणीकृत फर्म सन २०१३ पासून बाजार समितीच्या आवारात शेतकºयांकडून कांदा खरेदीचा व्यवहार करते. गेल्या चार महिन्यांत तालुक्यातील ६९ शेतकºयांना नाशिक अॅग्रोने कांदा खरेदीपोटी धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बँकेतून न वटता परत आल्याने व व्यापारी उडवा-उडवीची उत्तरे देऊन झुलवत ठेवत असल्याने शेतकºयांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली होती.
बाजार समितीमार्फत नाशिक अॅग्रोकडे विचारणा करण्यात येऊन शेतकºयांचे कांदा खरेदीचे पैसे तत्काळ अदा करण्याची सूचना करण्यात आली होती. सभापती विनायक तांबे यांनी संचालक मंडळाची बैठक घेतली. त्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सचिव विखे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. व्यापाºयांनी शेतकºयांची कांदा खरेदीची रक्कम १६ लाख ३७ हजार रुपये १४ मे रोजी बाजार समितीकडे जमा केली आहे. त्यामुळे बाजार समिती आरटीजीएसद्वारा परस्पर शेतकºयांचे पैसे खात्यात वर्ग करणार आहे. ज्या शेतकरी बांधवांची नाशिक अॅग्रो इंडस्ट्रिज यांच्याकडून कांदा विक्रीची रक्कम मिळणे बाकी आहे त्यांनी ताबडतोब बाजार समितीच्या सिन्नर कार्यालयात मूळ धनादेशाची प्रत, बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स, हिशेबपट्टी, पावत्या सादर कराव्यात, असे आवाहन बाजार समिती संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.