शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदणी आता मोबाइलद्वारे करता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:04+5:302021-08-25T04:20:04+5:30
शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात सुविधा ऑनलाइन उपलब्ध होणार असल्या तरी तलाठी कार्यालयात जायची गरजच पडणार आहे. खरेदी तसेच अत्यावश्यक कामांसाठी ...
शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात सुविधा ऑनलाइन उपलब्ध होणार असल्या तरी तलाठी कार्यालयात जायची गरजच पडणार आहे. खरेदी तसेच अत्यावश्यक कामांसाठी ऑनलाइन उतारा ग्राह्य धरला जात नाही, यामुळे शेतकऱ्याचे शेतकऱ्याला तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा उतारा महत्त्वपूर्ण ठरतो आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या अडचणी मात्र कमी झालेल्या नाहीत. तालुक्यात नवीन सजा निर्माण झाल्या आहेत. मात्र, तलाठी कर्मचारी अपुरे पडत असल्याने तलाठ्यांची पूर्तता करणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत सातबारा घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे ऑनलाइन पद्धतीचा कितीही वापर झाला तरी शेतकऱ्यांची सुविधा मात्र पूर्ण होतच नाही. त्यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना या अगोदर ऑनलाइन उतारा मिळण्याची सुरुवात झाल्यानंतर आता ऑनलाइन पीक पाहणी करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्याची सुविधा तर झालीच आहे; परंतु पिकांची नेमकी पाहणी करून ऑनलाइन पद्धतीने पीक पाहणी केल्यास नेमके पिकाची नोंदणी होणार आहे. यामुळे आता ऑनलाइन पीक पाहणी याचा वापर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पीक विमा किंवा पीक नुकसान अनुदान देण्यासाठी या पद्धतीचा वापर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेतकऱ्यांना आपला सातबारा भ्रमणध्वनीवर भ्रमणध्वनीद्वारे प्राप्त करता येत आहे. याच दृष्टीने आता पीक पाहणी नोंदणीमुळे आपल्या भ्रमणध्वनीद्वारे नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे मिळणारे अनुदान किंवा पीक विमा याचीही सुलभता होणार आहे. तलाठी कार्यालयात गेल्यानंतर सर्व्हर डाऊन किंवा या सुविधांचा वापर केल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.