राजापूर परिसरात पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 06:36 PM2019-07-24T18:36:22+5:302019-07-24T18:37:15+5:30
राजापूर : जिल्ह्यात पावसाने जोरदार सुरु वात केली असली तरी तालूक्यातील राजापूर येथे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरीही अजून वरूणराजाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. येथील शेतकऱ्यांकडून दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
राजापूर गावापासून पुर्वेकडील भागात असलेल्या वडपाटीकडील भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. बºयाच दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्ग संकटात असून कधी दमदार पावसाची हजेरी लागेल, या चिंतेने शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. राजापूर येथे मागील वषीॅ दुष्काळी परिस्थिती भयानक असताना यावषीॅ अजूनही पावसाने दडी मारल्याने पेरण्या पावसाअभावी खोळंबून पडल्या होत्या. राजापूर येथे सध्या पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चारा या चिंतेने जनता हैराण झाली आहे. त्यामुळे राहिलेल्या खरीप हंगामातील पेरण्या शनिवारी रात्री झालेल्या रिमझिम पावसावर सुरू आहेत. राजापूर येथे आतापर्यंत केवळ रिमझिम स्वरुपाचा पाऊस झाला असून जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे विहिरी या कोरड्याठाक पडल्या असून शेतकरी चिंतातूर झाले आहेत. काही दिवसापूर्वी अल्पशा पावसावर काही भागातील शेतक-यांनी मका, मुग, बाजरी, भुईमूग, कपाशी या पिकाच्या पेरण्या केल्या होत्या. आता त्या पिकांसाठी पावसाची गरज आहे. परिसरातील गावांना चांगल्याप्रकारे पाऊस झाला असून राजापूर येथील शेतक-यांना जोरदार पाऊसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामासाठी समाधानकारक पावसाची नितांत आवश्यकता असल्याने बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागून आहेत. गेल्या वषीॅ जुन महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या चार महिन्यातील तहान या गावाला टॅँकरवरच भागवावी लागते. मागील वषीॅदेखील शेतकरी वर्गाने केलेला खर्चही पावसाअभावी वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे यावषीॅ शेतकरी वर्गाकडे बी- बियाणे घेण्यासाठी पैसे नसून चारा व पाणीटंचाईने जनता हैराण झाली आहे.