कांद्यापाठोपाठ टमाट्याचे भाव कोसळल्याने शेतकरी चिंतातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:52 PM2017-09-21T23:52:34+5:302017-09-22T00:17:26+5:30
देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता लाल उन्हाळी कांदा, कोबीबरोबरच टमाटे उत्पादन घेणारे गाव म्हणून इतर राज्यांमध्ये झाली आहे. परंतु टमाट्याचे भाव कोसळ्याने कोवडीमोल भावाने टमाटा विकला जात असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा गावाची ओळख आता लाल उन्हाळी कांदा, कोबीबरोबरच टमाटे उत्पादन घेणारे गाव म्हणून इतर राज्यांमध्ये झाली आहे. परंतु टमाट्याचे भाव कोसळ्याने कोवडीमोल भावाने टमाटा विकला जात असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलते हवामानामुळे कांदा, डाळिंब आदि नगदी पिके धोक्यात आली आहे. या परिसरातील शेतकरी डाळिंब पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करीत होता. त्याच्यातून त्याला चांगल्यापैकी उत्पादन येऊन मोठ्या प्रमाणात पैसा हाती येत असे. कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जात असे. त्याच्यातूनही शेतकºयांची चांगली उलाढाल होत असे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून बेमोसमी अवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा फटका यामुळे कांदा पीक धोक्यात आले आहे. चालूवर्षी उन्हाळी कांद्याचे उत्पादन चांगल्यापैकी आले. परंतु मध्यंतरी उन्हाळी कांद्याच्या भावात वाढ कांदा २५०० ते २८०० विकला जाऊ लागल्याने शेतकºयांच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु पुन्हा उन्हाळी कांद्याचे भाव कमी होऊन १००० ते १२०० भावाने विकला जात असल्याने कांदा पिकावर केलेला खर्चही भरून निघत नाही. भावाअभावी कांदा चाळीत सडू लागला आहे.
माल पाहून त्याचा भाव केला जातो. शेतकºयाने शेतातून टमाटे तोडून बांधावर आणायचे आणि व्यापाºयाची माणसे पेपर टाकून प्लॅस्टिक क्रेटमध्ये भरून घेतात आणि जो भाव ठरला असेल आणि जेवढे क्रेट भरतील तो पैसा जागेवर रोख दिला जातो. यात ना आडत ना कमिशन त्यामुळे शेतकºयांचा पैशांबरोबर वेळेचीही बचत होत असे. परंतु सध्या टमाट्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने टमाटे प्रतिक्रेट पन्नास ते शंभर रुपयावर येऊन ठेपल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. टमाट्याच्या उत्पादन खर्चाचा विचार करता कांद्या, कोबी पिकाच्या पाठोपाठ टमाट्याचे पीकही तोट्यात आहे. यामुळे टमाटे पिकावर केलेला खर्चही भरून निघणार नाही त्यामुळे शेती व्यवसाय करणे मोठे मुश्कील झाले आहे. आता शेतात कोणते पीक करावे हा प्रश्न शेतकºयाला सतावत आहे. दुसरी पिके शेतकºयाला परवडत नाही.