येवला बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतित

By admin | Published: June 18, 2017 12:50 AM2017-06-18T00:50:47+5:302017-06-18T00:51:05+5:30

कांदा अवघा ४७५ रुपये : गेल्या आठवड्यातील संपाचा मोठा परिणाम

Farmers worried due to drop in onion prices in Yeola market committee | येवला बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतित

येवला बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतित

Next

कांदा अवघा ४७५ रुपये : गेल्या आठवड्यातील संपाचा मोठा परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : मुख्य बाजार आवारात सकाळी साडेदहाच्या सुमारास केवळ १३ ट्रॅक्टर व एक रिक्षामधून ३०० क्विंटल आवक झाली आणि उन्हाळ कांद्याला किमान रुपये १५० ते कमाल ६५६ रुपये तर सरासरी ५०० रुपये भाव होते. अंदरसूल उपबाजारात १७ ट्रॅक्टर सहा रिक्षा पिकअपमधून ४०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. अंदरसूल येथे कांद्याला किमान १५० रु पये ते कमाल ६०१ रु पये तर सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव होते.
गेल्या आठवड्यातील संपाचा मोठा परिणाम मार्केटवर झाला. कोट्यवधी रु पयाची उलाढाल ठप्प झाली होती. दरम्यान मार्केट सुरु झाले तरी फारसा उत्साह नाही.पोटाची खळगी आणि पेरणीसाठी पैसे लागतील. पर्याय शिल्लक नसल्याने साठवणीचे उन्हाळ कांदे बाजारात आणल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आवक कमी असल्याने किमान ४७५ रुपये मिळाले. कांदा बाजारभावाच्या चढउताराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शनिवारी (दि. १७) कांद्याला पुन्हा उतरती कळा लागली.
येवला मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांदा किमान १५० ते कमाल ५९१ तर सरासरी ४७५ रुपये भाव होते, तर उपबाजार अंदरसूल येथे उन्हाळ कांदा किमान १५० ते कमाल ५९० सरासरी ४८० रु पये भाव होते.भाव मिळण्याचा आशावाद४येवला तालुका तसा कोरडाच. दुष्काळाच्या छायेत शेतकरी वावरत असल्याचे नेहमीचे चित्र. कोणत्याही ऋतूत कधी उन्हाळ्यात, हिवाळ्यात अकाली पाऊस, किटकांचा प्रकोप होत असल्याने शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीही उरले नाही. तरीही पुन्हा नव्या उमेदीने शेतकरी उभा राहत आहे.
कांद्याला केवळ ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने पुरती निराशा आहेच. थोड्याफार पाण्यावर जगलेला उन्हाळ कांदा सध्या चाळीत भरला आहे. एक ट्रॅक्टर कांदा चाळीत भरण्यासाठी ४०० ते ५०० रु पये मजुरीचा खर्च, कांदा साठवणीत वातावरण बदलामुळे कांदा खराब होऊ नये म्हणून कीटकनाशके फवारणी करून कांदा साठवण केला आहे.

Web Title: Farmers worried due to drop in onion prices in Yeola market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.