पावसाअभावी पाथरे परिसरातील शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 07:42 PM2018-08-12T19:42:30+5:302018-08-12T19:42:46+5:30
पाथरे : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने झाले तरी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी, ग्रामस्थ चिंतेत आहेत.
पाथरे : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने झाले तरी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी, ग्रामस्थ चिंतेत आहेत.
पाथरे परिसरात सुरु वातीस पाऊस बरा पडला होता. त्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या होत्या. परंतु आता पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने चालू खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सध्या या भागातील पिके ही करपली आहे. दररोज ढग येत आहेत. परंतू पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच सध्या थंड वारा सुटत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. वारेगाव, पाथरे बद्रुक, पाथरे खुर्द परिसरात साधारण १३०० एकर जमीन आहे. या भागात संपूर्ण पेरण्या झाल्या आहेत. शेतकºयांनी सोयाबीन, बाजरी, मका या पिकांची पेरणी केली आहे. काही ठिकणी ऊस, डाळिंबाच्या बागा, आहेत परंतु पुरेसा पाऊस नसल्याने ही पिके पाण्यावाचून करपू लागली आहे. पेरणीसाठी शेतकºयांनी हजारो रुपये खर्च केला आहे. आता मात्र पीक आणि पैसेही वाया जाणार यात शंका नाही. आता शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यासाठी त्यांना पुन्हा बी- बियाणे खरेदी करावी लागणार आहेत. अगोदरच उसनवारी, कर्ज, पदरमोड करून शेतकर्यांनी पेरणी केली होती. आता पुन्हा हा खर्च पेलणार नसल्याचे दिसते. त्यातच पावसाचे प्रमाण कमी होत आहे. शेतकºयांनी मका, बाजरी पीकांचा विमा काढला आहे. परंतु सोयाबीन पीक परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा विमा मिळत नाही. पर्यायाने भरपाई मिळत नसल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली. गेल्या आठवड्यापासून आभाळ भरून येत आहे. आभाळ घोंगावत आहे, पाऊस पडत नसल्याने शेतकर्यांना पेरणी वाया जाण्याची भीती सतावत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकºयांबरोबर शेत मजुरांचीही अवस्था बिकट झाली आहे. शेतीची कामे मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे. असेच कायम राहिले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. परिसरातील जांब नदी, गवळण नदी व नदीवरील बंधार्यांचे खोलीकरण व रु ंदीकरण कामे झाली आहे. परंतु पाऊसच नसल्याने यात पाणी साठा उपलब्द होऊ शकलेला नाही. हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु म्हणावा तितका पाऊस न पडल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.