कांदा, द्राक्ष आगारात आर्थिक उलाढाल ठप्प येवला तालुक्यातील शेतकरी आला मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 08:24 PM2021-03-22T20:24:19+5:302021-03-22T20:25:12+5:30

जळगाव नेऊर : कांद्याच्या भावात सद्यामोठी चढउतार होत असुन फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असतांना मार्च महिन्यात मात्र शेतकऱ्यांना आठशे ते हजार रुपये दर मिळत आाहे. यातून शेतकऱ्यांचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सुस्त झाला आहे,

Farmers in Yeola taluka came to Metakutis after the economic turnover in onion and grape depots came to a standstill | कांदा, द्राक्ष आगारात आर्थिक उलाढाल ठप्प येवला तालुक्यातील शेतकरी आला मेटाकुटीस

जळगाव नेऊर परिसरात कांदा गाडीमध्ये भरतांना शेतकरी.

Next
ठळक मुद्देबाजारभावातील होणाऱ्या घसरणीमुळे शेतकरी धास्तावले

जळगाव नेऊर : कांद्याच्या भावात सद्यामोठी चढउतार होत असुन फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असतांना मार्च महिन्यात मात्र शेतकऱ्यांना आठशे ते हजार रुपये दर मिळत आाहे. यातून शेतकऱ्यांचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सुस्त झाला आहे,
यंदा बियाणे, रोप लागवडीपासून थेट काढणी अवस्थेपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी चिंतेतच आहे. त्यातच उन्हाळ कांदा रोपांची झालेली फसवणूक अवकाळी पाऊस, बदलते हवामान, फवारणी, खते, निंदणी तुलनेत कांदा उत्पादन खर्च जास्तीचा झाला आहे. मात्र उत्पादीत मालाला अपेक्षित भाव नाही. बाजारभावातील होणाऱ्या घसरणीमुळे शेतकरी धास्तावले आहेत.

यावर्षी शेतकऱ्यांनी मात्र इतर पिकांची होणारी परवड, नुकसान ऐवजी कांदा लागवडीचा शेतकऱ्यांनी पर्याय निवडला. अर्थात जुगाराच्या माध्यमातून नशिब आजमावले आहे. दरवर्षी जिल्ह्यात कांद्याची लागवड वाढत आहे. उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पादन काढणे गरजेचे आहे. मात्र हल्ली उत्पादन खर्च हा वाढत आहे. पूर्वी १५ ते २० रुपये किलो कांदा गेला तरी शेतकऱ्यांना परवडत होते. आता हा दर परवडत नाही. उत्पादन खर्च वाढल्याने एका दृष्टचक्रात कांदा पीक सापडले आहे.

कांदा बियाणेत फसवणूक

यंदा उन्हाळ कांदा बियाणांचा मोठा तुटवडा होता. त्याचा गैरफायदा बनावट कंपन्यांनी घेतला. तब्बल ५ हजारांवर अधिक भावाने शेतकऱ्यांनी बियाणे घेतली. ही बियाणे खरेदी केली उन्हाळ कांद्याचे, अन् निघाले लालचे, यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हा माल साठवणूक करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर बहुतांश शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा विक्री करावा लागत आहे. काही ठिकाणी बियाणे उगवले नाही. जे उगवले त्या कांद्याला डोंगळे आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना कधी वादळी पाऊस तर कधी शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे, द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण झालेला असुन दर्जेदार माल उत्पादित करून सुद्धा आज मात्र शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या दर्जेदार द्राक्षबागेला मातीमोल दर मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांचा दुसरा हंगामही कोरोनाच्या सावटाखाली सापडल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मात्र मेटाकुटीस आला आहे, खते ,औषधांची वाढलेले दर ,मजुरीचे वाढलेले दर पाहता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात काहीच नफा शिल्लक राहत नसल्याने शेतकरी ऐन हंगामात संकटात सापडला आहे ,मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा व्यापाऱ्यांअभावी ,तर कधी वाहतूक बंदमुळे अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेवर मनुके तयार झाले, मागील वर्ष कोरोना संकटात गेलेले असतानाच दुसरे वर्ष ही कोरोना संसर्ग साथीच्या सावटाखाली चालल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे

मी दीड एकरावर द्राक्षाची लागवड केली असून द्राक्ष बागेचे दोन प्लॉट केले आहे. तीस गुंठे प्लॉट जानेवारीच्या गारपीटीत सापडल्याने द्राक्ष बागेला पूर्णपणे तडे गेल्याने द्राक्ष फेकून द्यावे लागली व आता तीस गुंठ्यात ११० क्विंटल द्राक्षे बाग अवघ्या बारा रुपये दराने विकावी लागली म्हणजे यावर्षी द्राक्ष बागेतून खर्चदेखील वसूल झालेला नाही.
- सुशांत पानसरे, शेतकरी.

 

Web Title: Farmers in Yeola taluka came to Metakutis after the economic turnover in onion and grape depots came to a standstill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.