येवल्यातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:42 PM2020-12-26T17:42:54+5:302020-12-26T17:43:22+5:30

जळगाव नेऊर : पालखेड कालवा सल्लागार समितीच्या अकरा डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकर्‍यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन पाणी आवर्तनाचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या.

Farmers in Yeola waiting for the rotation | येवल्यातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत

येवल्यातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देरब्बीची पिके : तारखा जाहीर न केल्याने शेतकरी संभ्रमात

जळगाव नेऊर : पालखेड कालवा सल्लागार समितीच्या अकरा डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकर्‍यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन पाणी आवर्तनाचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या.

पण कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन पंधरा दिवस उलटूनही पाणी आवर्तनाबाबत कोणत्याही तारखा जाहीर न झाल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहे,
कारण ११ डिसेंबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन पालखेड डावा कालव्याला दोन आवर्तनाची घोषणा करण्यात आली, पण तारखा जाहीर न झाल्याने व पाणी मागणी अर्जाची मुदत ३० डिसेंबर पर्यंत असल्याने पालखेड डावा कालव्याचे आवर्तन केव्हा येणार ? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे,

याबाबत पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांची पाण्याची मागणी नसल्याने आवर्तनाबाबत निर्णय घेता येत नसल्याचे सांगण्यात आले . येवला पश्चिम भागातील चारी क्रमांक,२८ व २९ वरील तसेच कालव्यालगत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने रब्बीची पिके आवर्तनाच्या प्रतीक्षेत असुन जानेवारीच्या सुरुवातीला आवर्तन सोडण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे . कारण आवर्तन सुटल्यानंतरही पाणी अगोदर पूर्व भागात जाणार असल्याने व नंतर पश्चिम भागात पाणी सुटणार असल्याने त्यामध्ये पंधरा दिवसाचा कालावधी लोटणार असल्याने पाणी लवकर सुटल्यास शेतकऱ्यांचे कांदा,गहू, हरभरा, मका या पिकांना मदत होणार आहे.
यावर्षी परतीचा पाऊस जास्त दिवस लांबल्याने शेतकऱ्यांची रब्बीची पिके उशीरा झाली, नदीलगत शेतकऱ्यांना पाणी आहे पण मोठ्या प्रमाणात शेतकरी पाटाच्या पाण्यावर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांची पिके आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे.

प्रतिक्रिया...
आमच्या २८ नंबर वितरिकेवर बहुतेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला असून ऐन मोसमात पाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांची पिके कोमेजली आहे. तर काहींच्या कांदा लागवडी खोळंबल्या आहे. शेतकऱ्यांची आता सर्व आशा पालखेड डावा कालव्यावर आहे तरी पाटबंधारे खात्याने जानेवारीच्या सुरुवातीला आवर्तन दिल्यास गहु, हरभरा, कांदा पिकांना फायदा होणार आहे.

- मल्हारी दराडे, अध्यक्ष मतोबा पाणीवापर संस्था.

कालवा सल्लागार समितीच्या मीटिंगमध्ये २० जानेवारी च्या आसपास पाणी आवर्तन सोडण्याबाबत चर्चा झाली असून पाणी वापर संस्थांनी अर्ज भरून मागणी केल्यास त्या अगोदरही पाणी आवर्तनाबाबत विचार केला जाईल.
- संभाजी पाटील, अभियंता पाटबंधारे उपविभाग, येवला.

Web Title: Farmers in Yeola waiting for the rotation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.