कोरोना सावटातही शेतीची कामे सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 08:38 PM2020-05-10T20:38:44+5:302020-05-10T20:46:26+5:30
सिन्नर : कोरोनाचे थैमान जिल्ह्यात सुरूच असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसात नियंत्रणात आली नाही तर त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी कोरोनाच्या सावटातही शेती मशागतीची कामे सुरु केलेली आहे.
सचिन सांगळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कोरोनाचे थैमान जिल्ह्यात सुरूच असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसात नियंत्रणात आली नाही तर त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी कोरोनाच्या सावटातही शेती मशागतीची कामे सुरु केलेली आहे.
ग्रामीण भागात एकीकडे कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाउनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते किंवा बियाणे खरेदी करताना अडचणी येणार नाही, परंतु कोरोनाचा उद्रेक वाढत राहिला तर शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहे.
रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर कोरोनाचा राज्यात शिरकाव झाला आहे. आगामी काळातील शेतीच्या कामांसाठी शेतकºयांची धावपळ सुरू झालेली आहे. साधारत: मे महिन्याच्या शेवटी शेतकरी खते आणि बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी करीत असतात. यासाठी अजून जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी शेतकºयांच्या हाती आहे, मात्र या तीन आठवड्यात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल का या प्रश्नाचे उत्तर अद्याप तरी अनुत्तरित आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने शेती शिवारात शेतकºयांची लगबग वाढली आहे. दरम्यान या महिन्यात कोरोना आटोक्यात आला नाही तर शेती व्यवसायाची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे ही अवस्था असताना दुसरीकडे कृषी साहित्य विक्र ी करणारे चिंतेत आहेत. यावर्षी शेतकºयांना लाल कांद्याचे उत्पन्न कमी झाल्याने बळीराजा संकटात आहे. तर काही शेतकरी कांद्यास दर नसल्याने उन्हाळ कांद्याची साठवणूक करीत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीसिन्नर तालुक्यात खरिपाची पेरणी जवळपास पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर होत असते. यात सर्वाधिक म्हणजे २८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. तर १४ हजार हेक्टरवर बाजरी, आठ हेक्टरवर ऊस तर एक हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली जात असल्याचे कृषी विभागाने सांगितले. यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे ग्रामीण भागातील शेतकºयांनी नांगरणी, वखरणी, जमीन सपाटीकरण आदी कामे उरकली जात आहे.संकटाची मालिका सुरूचगेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पाऊस झाल्याने, खरिपाचे अपेक्षित उत्पन्न आले नाही. यात बाजरी, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चांगल्या प्रमाणात पाऊस होऊनही रब्बी हंगामातही पाहिजे तशी पिके आली नाही. गहू, सोयाबीन, मका, कांदा तसेच भाजीपाला पिकांना चांगला दर मिळाला नाही. तर आता कोरोनामुळे शेतकºयांना आपला पिकलेला मालही बाजारापर्यंत नेता येत नाही, अशी स्थिती आहे. दोन वर्षांपासून बळीराजासमोर संकटांची मालिका सुरू आहे.