शेतजमिनीचा वाद; बाप-लेकास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:05 AM2018-07-29T01:05:22+5:302018-07-29T01:06:13+5:30
शेतजमिनीच्या वादातून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप-लेकास न्या. सुचित्रा घोडके यांनी शुक्रवारी (दि़२७) सक्तमजुरी सुनावली़ जिभाऊ काळू खैरनार व अरुण जिभाऊ खैरनार (रा. गिरणारे शिवार, ता. देवळा) अशी आरोपींची नावे आहेत.
नाशिक : शेतजमिनीच्या वादातून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप-लेकास न्या. सुचित्रा घोडके यांनी शुक्रवारी (दि़२७) सक्तमजुरी सुनावली़ जिभाऊ काळू खैरनार व अरुण जिभाऊ खैरनार (रा. गिरणारे शिवार, ता. देवळा) अशी आरोपींची नावे आहेत. २०१४मध्ये बाप-लेकाने चुलत भाऊबंद काशीनाथ खैरनार यांना गंभीर जखमी केले होते़ देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. निरीक्षक बी़ बी़ सातपुते यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़
पुरावे सादर
न्यायाधीश घोडके यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील अॅड़ सुप्रिया गोरे यांनी साक्षीदारांची तपासणी करून परिस्थितीजन्य पुरावे सादर केले़ यावरून आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली़ न्यायालयातील पैरवी अधिकारी हवालदार नाईक यांनी सहाय्य केले.