मालेगावी स्वच्छता अभियानाचा फार्स

By admin | Published: January 10, 2016 10:23 PM2016-01-10T22:23:16+5:302016-01-10T22:29:42+5:30

मालेगावी स्वच्छता अभियानाचा फार्स

FARS OF Malegaavi Hygiene Campaign | मालेगावी स्वच्छता अभियानाचा फार्स

मालेगावी स्वच्छता अभियानाचा फार्स

Next

मालेगाव कॅम्प : मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, हा केवळ फार्स ठरू नये. तशी अनेकदा मोहीम राबवली जाते. काही काळानंतर मोहीम बासनात गुंडाळण्यात येते व शहराची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ होते. महापालिकेच्या या मोहिमेचे शहरात स्वागत होत असले, तरी यामुळे केवळ घोषित केलेल्या परिसरातील स्वच्छता मोहिमेसह इतर ठिकाणचीही सफाई करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
शहरात स्वच्छतेचा प्रश्न पाचवीला पुजला आहे. महापालिकेने कोट्यवधीचा ठेका साफसफाईसाठी ठेकेदारास दिला आहे. परंतु त्या ठेकेदाराच्या कामाबाबत सुधारणा झालेली नाही. अनेक ठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहण्यास मिळते. पालिकेच्या चारही प्रभागांतील असंख्य वॉर्डांमधील साफसफाई कर्मचाऱ्यांच्या कामांचे नियोजन करण्यात येते; परंतु हे नियोजन भरकटलेले असते. त्यामुळे वॉर्डाच्या सफाईचा प्रश्न गंभीर होतो. गटारीतून काढलेला गाळ व कचरा वसाहतींच्या रस्त्यांवर मुख्य चौकात अनेक दिवस पडलेला दिसतो.
घंटागाडी वॉर्डात तीन दिवसाआड येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही वॉर्डांत सफाई महिला सकाळी रस्ते झाडतात व तो कचरा रस्त्याच्या कडेला ढिगारे करून लावतात. हा कचरा दिवसभर तेथेच पडलेला असतो. नंतर रस्त्यावर पुन्हा पसरतो. याबाबत तक्रारी विशेष प्रभाग कार्यालय-१ मध्ये केल्या.
परंतु तेथून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होतो, तर काही परिसरात
अद्याप गटारी नाहीत त्या ठिकाणी कचरा उचलणारे मोठे ट्रॅक्टर्स
कचरा उचलण्यासाठी टाळाटाळ करतात.
परिसरातील अनेक बंगले व सोसायटीमधील बगीचांचा पालापाचोळा, झाडांच्या फांद्यासारखा कचरा हे ट्रॅक्टर्सवाले उचलण्यास असमर्थता दर्शवतात. हे काम उद्यान विभागाचे असल्याचा सल्ला
देतात. यामुळे हा बगीचा साफसफाईचा कचरा परिसरात अनेक दिवस पडलेला असतो. यामुळे बारीक चिल्टे, मच्छरांचा त्रास परिसरात सुरू असतो. (प्रतिनिधी)

Web Title: FARS OF Malegaavi Hygiene Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.