लेखी आश्वासनानंतर ‘प्रहार’चे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 02:34 PM2019-09-18T14:34:22+5:302019-09-18T15:06:17+5:30
उमराणे : थकीत शेतकऱ्यांचे पैसे मिळवुन देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असल्याचे लेखी आश्वासन देवळ्याचे सहाय्यक निबंधक व उमराणे बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांनी दिल्यानंतर प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने उपोषण दुसºया दिवशी मागे घेण्यात आले.
उमराणे : थकीत शेतकऱ्यांचे पैसे मिळवुन देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असल्याचे लेखी आश्वासन देवळ्याचे सहाय्यक निबंधक व उमराणे बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांनी दिल्यानंतर प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने उपोषण दुसºया दिवशी मागे घेण्यात आले. हे उपोषण दि. १७ रोजी सकाळी सुरू करण्यात आले होते.
नोटबंदीच्या काळात उमराणे येथील १२ व्यापाºयांनी ८३५ शेतकºयांना कांदा शेतमाल विक्र ीपोटी २ कोटी, ७९ लाख, ३७ हजार, ८६० रु पये धनादेशद्वारे दिले होते. परंतु सदर व्यापाºयांच्या खात्यावर पैसे शिल्लक नसल्याने धनादेश बाऊन्स होऊन शेतकर्यांची फसवणूक झाली होती. या घटनेस दिड ते दोन वर्ष झाले तरीही थकीत शेतकर्यांना पैैसे मिळत नसल्याने प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने यासह विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या कार्यालयासमोर उषोषण छेडले होते. मागण्यांसंर्भात ठोस आश्वासन मिळत नसल्याने सायंकाळी उशिरापर्यंत उपोषण लांबले होते.अखेर पोटे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात नमुद केल्याप्रमाणे थकीत शेतकर्यांचे पैसे मिळण्याबाबतची प्रक्रि या न्यायप्रविष्ट् असल्याने सदर शेतकर्यांचे पैसे मिळण्यासाठी विलंब झाला असुन संबंधित व्यापार्यांवर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६३ मधील तरतुदीनुसार जमीन महसुलाची थकबाकी (आर.सी.सी.) अंतर्गत वसुल करण्याची कार्यवाही करण्यास देवळा तहसिलदारांना आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सदर व्यापार्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.