वेहेळगावी बॅँकेच्या मनमानीविरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 11:54 PM2020-08-05T23:54:15+5:302020-08-06T01:42:57+5:30

वेहेळगाव : पीककर्जाचे प्रस्ताव प्रलंबित ठेवणे व अनुदान वेळेवर खात्यात जमा न करणाऱ्या बॅँकेच्या मनमानीला वैतागून संतप्त शेतकऱ्यांनी बॅँकेसमोर उपोषण करून राग व्यक्त केला.

Fasting against the arbitrariness of Vehelgaon Bank | वेहेळगावी बॅँकेच्या मनमानीविरोधात उपोषण

वेहेळगावी बॅँकेच्या मनमानीविरोधात उपोषण

Next
ठळक मुद्देवेहेळगाव येथे बॅँकेसमोर उपोषणास बसलेले सुभाष कुटे, विजय थोरे, हनुमान गिते, भास्कर बुरकुल यांच्यासह परिसरातील शेतकरी.

वेहेळगाव : पीककर्जाचे प्रस्ताव प्रलंबित ठेवणे व अनुदान वेळेवर खात्यात जमा न करणाऱ्या बॅँकेच्या मनमानीला वैतागून संतप्त शेतकऱ्यांनी बॅँकेसमोर उपोषण करून राग व्यक्त केला.
वेहेळगाव येथे बॅँक आॅफ महाराष्टÑची शाखा असून, या शाखेतील अधिकारी शेतकºयांना सहकार्य करीत नसल्याचा अनुभव परिसरातील अनेक शेतकºयांनी घेतला आहे. दोन-दोन महिने पीककर्जाचे वाटप न करणे, शेतकºयांना वारंवार चकरा मारायला लावणे, पीककर्जाचे प्रस्ताव प्रलंबित ठेवणे, २०१६-२०१७ पूर्वी दिलेल्या पीककर्जापेक्षा शासन नियमानुसार दहा टक्के वाढीव कर्ज देता येत नाही असे सांगून टाळाटाळ करणे, पीककर्जाची नोटीस उपलब्ध करून न देणे तसेच बॅँकेत जमा झालेले अनुदान शेतकºयांना वेळेवर न देणे यासह अनेक अडचणींमुळे वेहेळगाव परिसरातील शेतकरी वैतागले आहेत. बँकेचे शेतकी अधिकारी व व्यवस्थापक यांच्यातील अंतर्गत वादामुळे शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व अडचणींसह दुष्काळी तसेच इंदिरा गांधी निराधार अनुदानासाठी शेतकºयांनी मंगळवारी बँकेसमोर उपोषण केले. उपोषणासाठी सुभाष कुटे, विजय थोरे, हनुमान गिते, भास्कर बुरकुल त्याचबरोबर वेहेळगाव, पळाशी, सावरगाव, बोराळे, तळवाडे, जळगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
मंडळ अधिकारी पैठणकर यांनी मध्यस्थी करून व बँक व्यवस्थापकांनी पीक कर्ज वाढ, प्रत्येक गावातील शेतकºयांना बँकेत वेगवेगळया दिवशी बोलवणे, शासन अनुदान लवकरात लवकर खात्यात जमा करणे, पीक कर्जाचे विनाविलंब वाटप करण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. वेहेळगाव परिसरातील शेतकरी बँकेच्या व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाराला कंटाळले होते. तसेच विविध अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हे उपोषण करण्यात आले. सदर उपोषण मंडळ अधिकारी व बँक अधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनामुळे सोडण्यात आले. त्यानंतर आश्वासनाची पूर्तता न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही उपोषणास बसू.
- सुभाष कुटे, पंचायत समिती सदस्य, नांदगाव

Web Title: Fasting against the arbitrariness of Vehelgaon Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.