कर्जमाफी विरोधात उपोषण

By admin | Published: June 27, 2017 01:25 AM2017-06-27T01:25:47+5:302017-06-27T01:26:03+5:30

सायगाव : सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीविरोधात येथील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी वेळेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

Fasting against debt waiver | कर्जमाफी विरोधात उपोषण

कर्जमाफी विरोधात उपोषण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सायगाव : सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीविरोधात येथील शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी वेळेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने ३० जून २०१५-१६ पर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांनाच दीड लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या कर्जमाफी निकषात केवळ ८ ते १० टक्केच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, तर उर्वरित नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या ९० टक्के शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवले जाणार आहे. ही शेतकऱ्यांची चेष्टा असून, शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात पेटून उठण्याची गरज व्यक्त करत सायगावकरांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत पुन्हा शेतकरी आंदोलनाची मशाल पेटवली आहे.  एका बाजूला सरसकट कर्जमाफीचा शब्दप्रयोग करायचा व दुसऱ्या बाजूने विविध निकषांचा फास शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळायचा या नीतीचा अवलंब सरकारने केला आहे असल्याची माहिती शिवाजी भालेराव यांनी दिली. उपोषणास येवला तालुका खरेदी-विक्री संघ संचालक भागुनाथ उशीर, सरपंच योगीता भालेराव, उपसरपंच गोरख भालेराव, माजी सरपंच सुनील देशमुख, दिनेश खैरनार, ज्ञानेश्वर भालेराव, विजय खैरनार, रघुनाथ खैरनार, महेंद्र उशीर, रामनाथ उशीर, एकनाथ भालेराव, विठ्ठल दारुंटे, संजय देशमुख, बशीरभाई शेख, वसंतराव खैरनार, पोपट भालेराव, शिवाजी उशीर, सीताराम लोहकरे, काशीनाथ जठार, पारसनाथ सोनवणे, जिजाराम उशीर, नाना  उशीर, देवराम उशीर, दत्तू उशीर, दत्तात्रय कुळधर, संजय मुळे यांच्यासह सव्वाशे शेतकरी उपस्थित होते.


 

Web Title: Fasting against debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.