वीज कंपनीच्या विरोधात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:19 AM2017-10-17T00:19:51+5:302017-10-17T00:20:20+5:30
नाशिक : येवला तालुक्यातील राजापूर उपकेंद्र तसेच तेथील कार्यरत कर्मचाºयांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गोरख उत्तम सानप या शेतकºयाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.
नाशिक : येवला तालुक्यातील राजापूर उपकेंद्र तसेच तेथील कार्यरत कर्मचाºयांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गोरख उत्तम सानप या शेतकºयाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.
या संदर्भात सानप यांनी जिल्हाधिकाºयांना तक्रारीचे निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, राजापूर येथे वीज कंपनीने खासगी व्यक्ती विजेच्या कामासाठी ठेवला असून, तो गावात राजकारण करीत असतो तसेच त्याला दारूचे व्यसन असल्याने चुकीचे कामे केली जातात. त्यामुळे अनेक ग्राहकांना शॉक लागून अपघात घडले आहेत. राजापूर उपकेंद्रात एकही कर्मचारी राहत नसून, या ठिकाणी नियुक्त असलेले इंजिनिअर कधीच गावात येत नाहीत. येवला रोडवरील २५ केव्हीचे रोहित्र गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून बंद असून, शेतकºयांना पिकांना पाणी देता येत नाही या साºया गोष्टीस उपअभियंता राजेंद्र पाटील हे जबाबदार असून, त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.