अवैध वाळू उपशाविरुद्ध नदीपात्रात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:59 AM2018-08-11T01:59:11+5:302018-08-11T01:59:32+5:30
मुंजवाड : खमताणे येथील आरम नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थांबविण्यासह नदीपात्रात अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शुक्रवारपासून (दि.१०) नदीपात्रातील खड्ड्यातच उपोषण सुरू केले आहे.
मुंजवाड : खमताणे येथील आरम नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थांबविण्यासह नदीपात्रात अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शुक्रवारपासून (दि.१०) नदीपात्रातील खड्ड्यातच उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण, मंडल अधिकारी जी. डी. कुलकर्णी व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
सरपंच शीतल प्रदीप इंगळे, उपसरपंच नितीन वाघ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पंडित इंगळे, अमोल वाघ, देवीदास पवार आदींसह प्रदीप इंगळे प्रकाश वाघ, गणेश वाघ यांनी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची भेट घेऊन चार दिवसांपूर्वी निवेदन सादर केले
होते.
गावाच्या हद्दीतील आरम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याबाबत तक्र ारी करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे वाळू माफिया मुजोर बनले असून वाळू उपशासविरोध केल्यास धमक्या दिल्या जातात. शासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग पत्करण्यात आला. उपोषणस्थळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, नायब तहसिलदार विनोदकुमार चव्हाण व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. कारवाईसंबंधी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा निर्धार करण्यात आला.
सरपंच शीतल इंगळे, नितीन वाघ यांचेसह सदस्य सिंधुबाई बागुल, देविदास पवार,अमोल वाघ,पंडित इंगळे, मेनका बच्छाव, बेबी कराटे, रंजनाबाई वाघ, प्रदिप इंगळे, प्रकाश वाघ, गणेश वाघ, साहेबराव वाघ, राजेंद्र वाघ, देविदास बच्छाव, रविंद्र पवार, बारकु वाघ , शेखर बागुल, विश्वनाथ माळी, ज्ञानेश्र्वर जाधव, मनोहर जाधव तसेच खमताने व मुंजवाडचे ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले आहेत.