कंत्राटी कामगारांचे उपोषण : आरोग्य विद्यापीठ सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:03 AM2018-05-08T01:03:23+5:302018-05-08T01:03:23+5:30
विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या उपोषणादरम्यान, एकामागून एक आंदोलकांची प्रकृती खालावल्याने सरकारने या आंदोलनाचा धसका घेतला आहे. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांच्यासह सोमवारी (दि. ७) आंदोलकांची भेट घेऊन शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली.
नाशिक : विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या उपोषणादरम्यान, एकामागून एक आंदोलकांची प्रकृती खालावल्याने सरकारने या आंदोलनाचा धसका घेतला आहे. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांच्यासह सोमवारी (दि. ७) आंदोलकांची भेट घेऊन शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन मिळावे आणि कामावरून कमी केलेल्या ९ कामगारांसह सर्व कामगारांना एकाचवेळी कामावर घेण्याच्या मागण्यांविषयी विद्यापीठाने सकारात्मक भूमिका घेतल्याने मंगळवारी दुपारपर्यंत कामगारांचे उपोषण संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांविषयी विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मकता दाखवली असली तरी याविषयावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांसदर्भात मंगळवारी (दि.८) दुपारी पुन्हा शिष्टमंडळ व विद्यापीठ प्रशासनासह आमदार सानप यांची बैठक होणार असून, या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन सानप यांनी दिले. तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आंदोलकांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले. परंतु आंदोलकांनी अंतिम निर्णय झाल्याशिवाय उपोषण न सोडण्याची भूमिका घेतल्याने मंगळवारी दुपारी कामगारांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन आमदार बाळासाहेब सानप व कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी कामगारांना दिले आहे. यावेळी कामगार उपायुक्त किशोर दहीफळकर, सीताराम ठोंबरे, अॅड. तानाजी जायभावे, श्रीधर देशपांडे आदी उपस्थित होते. दरम्यान, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी मुंबईत पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत चर्चा केली.
जिल्हाधिकाºयांकडून अपेक्षाभंग
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाºयांनी महाराष्ट्र दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले असून, सहा आंदोलकांची प्रकृतीही बिघडली आहे. यातील काहींची प्रकृती अतिशय गंभीर बनलेली असताना जिल्हाधिकाºयांशी चर्चेसाठी सतत सात दिवस पाठपुरावा केल्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाला सोमवारी चर्चेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडून केवळ पाच मिनिटांचाच वेळ मिळाला. आंदोलकांच्या शिष्टमंडळानेही पाच मिनिटांतच कामगारांची भूमिका मांडली. परंतु जिल्हाधिकाºयांनी कोणतेही ठोस आश्वासन न देता शिष्टमंडळास आंदोलन संपविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आंदोलकांचा जिल्हाधिकाºयांकडून अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया सीटूचे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.