कंत्राटी संगणक परिचालकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:22 AM2017-10-13T00:22:09+5:302017-10-13T00:22:16+5:30
जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाºया आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१२) जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाºया आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१२) जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकांचे माहे फेब्रुवारी २०१७ पासूनचे मानधन अद्यापपर्यंत मिळालेले नाही. संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून दोन वर्षांपासून दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे २५ सप्टेंबर २०१७पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आता १२ आॅक्टोबरपासून राज्यातील सर्व जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्यांपैकी संगणक परिचालकांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सर्वसुविधा मिळाव्यात, टास्क कर्न्फमेशन ही जाचक अट रद्द करून शासन नियमाप्रमाणे निश्चित सहा हजार इतके वेतन प्रत्येक महिन्याला एकाच तारखेला मिळावे, संग्राम प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील सर्व संगणक परिचालकांना या प्रकल्पात सामावून घेणे, महाआॅनलाइनकडील डिसेंबर २०१५ पर्यंत मानधन मिळणे या मागण्यांचा समावेश आहे. या उपोषणात संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश देशमुख, सचिव अण्णासाहेब काळे, विकास गहिले यांच्यासह कंत्राटी संगणक परिचालक उपस्थित होते.