सिंगल फेज वीज पुरवठ्यासाठी दहिवड सरपंचाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 01:22 PM2019-09-18T13:22:55+5:302019-09-18T13:23:04+5:30

देवळा : तालुक्यातील दहिवड गावात व परिसरात सिंगल फेज वीजपुरवठा नियमित सुरू करण्यासाठी सरपंच आदिनाथ ठाकूर यांनी मंगळवार ( १७) रोजी वीज उपकेंद्रासमोर उपोषण केले.

Fasting of Dahiwad Sarpanch for single phase power supply | सिंगल फेज वीज पुरवठ्यासाठी दहिवड सरपंचाचे उपोषण

सिंगल फेज वीज पुरवठ्यासाठी दहिवड सरपंचाचे उपोषण

Next

देवळा : तालुक्यातील दहिवड गावात व परिसरात सिंगल फेज वीजपुरवठा नियमित सुरू करण्यासाठी सरपंच आदिनाथ ठाकूर यांनी मंगळवार ( १७) रोजी वीज उपकेंद्रासमोर उपोषण केले. यावेळी कळवण-देवळा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता रु पेश टेंभूर्णे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
दहिवड गावात व परिसरात येथील ३३-११ केव्ही क्षमता असलेल्या उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो. जवळपास शंभराच्या आसपास रोहित्र आहेत यापैकी काही रोहित्र नादुरु स्त झालेले आहेत तर काही ठिकाणी सिंगल फेज रोहित्रच नाहीत त्यामुळे या परिसरातील काही भागात रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा होत नसल्याने येथील ग्रामस्थांना विजेअभावी रात्र काढावी लागत आहे. यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरण मात्र, या समस्येचे निराकरण करण्याची तसदी घेत नसल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे. गृहिणीही अनियमित वीज पुरवठ्याने त्रस्त झाल्या आहेत. गावातील विजेची समस्या निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी वारंवार महावितरणकडे मागणीही केली; परंतु त्याची दखल अद्यापही घेण्यात आली नाही. महावितरण अधिकार्यांकडून केवळ सिंगल फेज विजपुरवठ्याचे काम चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे पोकळ आश्वासन देण्यात येत आहेत. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही त्यामूळे सरपंच आदिनाथ ठाकूर यांनी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता दिहवड येथील ३३-११ केव्ही वीज उपकेंद्रासमोर ग्रामस्थांसह आमरण उपोषणाला सुरु वात केली होती. यावेळी कार्यकारी अभियंता रु पेश टेंभूर्णे, व सहायक अभियंता आर. पी. महाजन यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर लिंबू सरबत घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी उपसरपंच मनिष ब्राम्हणकार, कृष्णा जाधव, गणेश देवरे, संजय दहिवडकर, बापुसाहेब देवरे आदी उपस्थित होते.

Web Title: Fasting of Dahiwad Sarpanch for single phase power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक