वितरिकांना पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:51 AM2017-08-12T00:51:24+5:302017-08-12T00:51:43+5:30
पालखेड कालवा लाभक्षेत्रातील एरंडगाव व पुरणगाव शिवारातील सर्व वितरिकांना चालू आवर्तनातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी एरंडगाव येथील शेतकºयांनी पालखेड पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या मागणीसाठी येवल्याचे तहसीलदार नरेश बहीरम यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र वितरिकांना पाणी मिळाले नसल्याने शेतकºयांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. पालखेड डाव्या कालव्याला बºयाच दिवसांपासून पाणी आवर्तन चालु आहे.
येवला : पालखेड कालवा लाभक्षेत्रातील एरंडगाव व पुरणगाव शिवारातील सर्व वितरिकांना चालू आवर्तनातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी एरंडगाव येथील शेतकºयांनी पालखेड पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या मागणीसाठी येवल्याचे तहसीलदार नरेश बहीरम यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र वितरिकांना पाणी मिळाले नसल्याने शेतकºयांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. पालखेड डाव्या कालव्याला बºयाच दिवसांपासून पाणी आवर्तन चालु आहे. मात्र वितरिका क्र मांक ३३ ला सोडलेले पाणी त्वरीत बंद केल्याने ते सर्व शेतकºयापर्यंत पोहोचले नाही. ही बाब पालखेड पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून देउनही प्रशासनाने दूर्लक्ष केले. या वितरीकांचे पाणी दुसरीकडे वळविण्यात आले आहे. या वितरीकेला पाणी मिळाले तर परिसरातील ४०० ते ५०० शेतकºयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, मात्र दरवेळेस येणाºया आवर्तनात अशाच प्रकारे शेवटच्या शेतकºयांना डावलण्यात येते. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी उपोषण सुरु केले आहे. उपोषणास एरंडगाव येथील किरण चरमळ, प्रमोद ठोंबरे, विजय ठोंबरे, रामदास ठोंबरे, वाल्मिक ठोंबरे आदींसह शेतकरी बसले आहेत. वितरीकांना पाणी मिळत नाही. तो पर्यत उपोषण सूर ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.