निसाका-रासाका कार्यान्वित करण्यासाठी अजित पवार यांच्या दालनासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 07:26 PM2020-12-02T19:26:59+5:302020-12-03T00:35:05+5:30

सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना व रानवड साखर कारखाना चालू गळीत हंगामात कार्यान्वित करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गतवर्षी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा या मागणीसाठी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी पवार यांच्या दालनात बुधवारी (दि.२) धडक देत आमरण उपोषण करण्याचा प्रयत्न केला.

Fasting in front of Ajit Pawar's hall to implement Nisaka-Rasaka | निसाका-रासाका कार्यान्वित करण्यासाठी अजित पवार यांच्या दालनासमोर उपोषण

निफाड कारखाना कार्यान्वित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी उपोषण करतांना खडूं बोडके व शेतकरी.

Next
ठळक मुद्देसायखेडा : मंत्रालयात भेट घेऊन खंडू बोडके-पाटील यांची घेतली दखल

सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना व रानवड साखर कारखाना चालू गळीत हंगामात कार्यान्वित करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गतवर्षी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा या मागणीसाठी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी पवार यांच्या दालनात बुधवारी (दि.२) धडक देत आमरण उपोषण करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान मंत्रालय पोलिसांनी कोविडमुळे अजित पवार यांच्या दालनात उपोषणास प्रतिबंध केला. तरीही खंडू बोडके-पाटील आंदोलनावर ठाम असल्याने दालनात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ दखल घेत माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत खंडू बोडके-पाटील यांना चर्चेसाठी पाचारण करून निवेदन स्वीकारत सविस्तर चर्चा केली.!
निफाड सहकारी साखर कारखाना कार्यान्वित करण्यासाठी प्राधान्य देऊन रासाकाची तत्काळ निविदा काढण्याची मागणी यावेळी अजित पवार यांच्याकडे खंडू बोडके-पाटील यांनी केली. त्याबाबत अजित पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी लवकरच चर्चा करून सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पवार यांनी सहकारमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मात्र आपण निफाडकरांना दिलेला शब्द ज्ञात असून निसाका-रासाकाबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले. माजी आमदार अनिल कदम यांनीही यावेळी शिष्टमंडळासमवेत अजित पवार व बाळासाहेब पाटील यांना महाआघाडीचे सरकार असल्याने कारखाने कार्यान्वित करण्यासाठी राजकारणविरहित साकडे घातले.

. यावेळी शिष्टमंडळामध्ये पंचायत समिती सभापती शंकर संगमनेरे, शहाजी राजोळे, संदीप टर्ले, देवेंद्र काजळे, समीर जोशी, बाळासाहेब पावशे, दत्तू भुसारे, सागर जाधव, नंदू राजोळे, राजेंद्र राजोळे, नितीन निकम, योगेश बोराडे, नंदू निर्भवणे, आप्पा राजोळे, अनिल जोगदंड, बाळासाहेब कानडे, रमजू तांबोळी, नितीन मोगल, रामा शिंदे आदी उपस्थित होते.

मंत्रालयात कोरोनाचे कारण देत अजित पवार यांच्या दालनाबाहेर आमरण उपोषणास पोलिसांनी प्रतिबंध केला असला तरी अजित पवार यांनी दखल घेत कारखान्या बाबत चर्चा केली. मात्र कोरोनाचे कारण देत निसाकाबाबत ठोस आश्वासन न दिल्याने आपले समाधान झाले नसून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर जबाबदारी ढकलून अजित पवार यांनी टोलवाटोलवी केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निसाका-रासाकाचा संघर्ष सुरूच ठेवणार आहे.
- खंडू बोडके-पाटील, माजी सरपंच, करंजगाव.

 

Web Title: Fasting in front of Ajit Pawar's hall to implement Nisaka-Rasaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.