नारायणगाव येथील शेतकऱ्याचे चांदवड तालुका कृषी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 06:29 PM2019-05-07T18:29:54+5:302019-05-07T18:32:09+5:30

चांदवड - महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या संरक्षीत शेती योजनेंतर्गत शेडनेट उभारणी करताना पुरवठादाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्यामुळे शेतीपिकाचे सुमारे १३ लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत नुकसान झालेल्या शिमला मिरची पिकाचा वस्तुनिष्ठ पंचनामा व अहवाल मिळावा या मागणीसाठी तालुक्यातील नारायणगाव येथील संदिप मांदळे या शेतकºयाने सोमवारपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

 Fasting in front of Chandwad taluka agriculture office of Narayangaon farmer | नारायणगाव येथील शेतकऱ्याचे चांदवड तालुका कृषी कार्यालयासमोर उपोषण

नारायणगाव येथील शेतकऱ्याचे चांदवड तालुका कृषी कार्यालयासमोर उपोषण

googlenewsNext

महाराष्ट्र कृषी विभागाच्या संरक्षीत शेती योजनेंतर्गत शेडनेट उभारण्यासाठीची ५० टक्के अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत मांदळे यांचे दोन्ही शेतकरी भाऊ राजेंद्र व किरण मांदळे यांनी प्रत्येकी दहा लाख रु पये याप्रमाणे २० लाख रु पये खर्च करु न शेडनेट हाऊस प्रकल्पाची उभारणी केली होती. मात्र या शेडनेटची उभारणी करताना पुरवठादाराने शासन निर्णयानुसार साहित्य न पुरवता शेडनेट व शेडनेटचे सर्व साहित्य निकृष्ट प्रतीचे पुरवले तसेच सुक्ष्म सिंचनाचे काम अपूर्ण ठेवल्याने डिसेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ या कालावधीत दोन्ही शेतकऱ्यांच्या शिमला मिरची पिकाचे प्रत्येकी साडेसहा लाख असे सुमारे १३ लाख रु पयांचे नुकसान झाल्याचे मांदळे यांनी सांगीतले. याबाबत मांदळे यांनी दोन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी, कृषी विभाग पंचायत समिती चांदवड, तहसील, प्रांत, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय आदी संबंधीत विभागांकडे पत्रव्यवहार केला होता. याबाबत आयुक्तालय व कृषी अधिक्षक यांनी सदर पुरवलेले साहित्य, अपूर्णावस्थेतील काम व पिकाचे नुकसान याबाबत तपासणीचे आदेश काढूनही त्याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत मांदळे यांनी मुद्देनिहाय माहिती देण्याबाबत दि. २३ एप्रिल रोजी तालुका कृषी अधिका-यांना निवेदन सादर करु न उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र कोणतीही माहिती देण्यात न आल्याने शेडनेट उभारणीसाठी पुरवठादाराने ठेवलेल्या अपूर्णावस्थेतील कामाचा, पुरविलेल्या साहित्याचा व नुकसान झालेल्या पिकाचा वस्तुनिष्ठ अहवाल व पंचनामा मिळावा या मागणीसाठी मांदळे यांनी उपोषण सुरु केले आहे.

Web Title:  Fasting in front of Chandwad taluka agriculture office of Narayangaon farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी